जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नदीवरील पुलाच्या कठड्यावर स्टंट मारताच तोल गेला आणि...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

नदीवरील पुलाच्या कठड्यावर स्टंट मारताच तोल गेला आणि...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

नदीवरील पुलाच्या कठड्यावर स्टंट मारताच तोल गेला आणि...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

नदीवरील पुलाच्या कठड्यावर स्टंट करणं तरुणीला पडलं महागात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 मार्च : हल्ली तरुणांमध्ये स्टंटचं क्रेझच आहे. प्रसिद्धीसाठी ते काहीही करू शकतात. तरुणच नाही तर तरुणीही अगदी मागे नाहीत. तरुणीही जीवघेणे स्टंट करताना दिसतात. अशाच एका स्टंटबाज तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जिने खतरनाक ठिकाणी स्टंट केला आहे. जो पाहूनच तुम्हाला धडकी भरेल. स्टंट करण्याच्या नादात तरुणीसोबत भयंकर दुर्घटना घडली आहे.  व्हिडीओत पाहू शकता एका नदीवरील पुलाच्या कठड्यावर ही तरुणी आहे. कठड्यावर जागा खूपच कमी आहे. सुरुवातीला तरुणी आपल्या दोन्ही हातांवर उलटी राहिलेली दिसते. त्यानंतर तर सरळ होते. तेव्हा स्टंट मारताना अचानक तिचा तोल जातो आणि ती नदीत कोसळताना दिसते. ही तरुणी पाण्यात पडली की नाही ते या व्हिडीओत दिसत नाही आहे. पण ज्या पद्धतीने ती कोसळली त्यानुसार ती पाण्यात पडली असावी. ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतानाही दिसते. पण त्याची शक्यता कमीच आहे. हे वाचा -  चालत्या कारच्या खिडकीतून उडू लागली ‘पापा की परी’; शालेय विद्यार्थीनीचा जीवघेणा स्टंट VIDEO VIRAL कठड्याजवळ सुरक्षेसाठी रेलिंग लावण्यात आल्या आहेत. जेणेकरून कुणी नदीत पडू नये. पण तरी ही तरुणी रेलिंग पार करून पलिकडे जाते आणि तिथं एवढ्याशा जागेत स्टंट करण्याचा प्रयत्न करते.

जाहिरात

runningfervor नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात