मुंबई, 26 मार्च : मांजर आणि उंदीर यांच्याबाबत तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही (Cat rat funny video). कार्टुनमधील टॉम अँड जेरीप्रमाणेच प्रत्यक्षातही त्यांची जोडी आहे. म्हणजे आपल्यासमोरही उंदीर-मांजराचा मजेशीर खेळ आपण बऱ्याच वेळा प्रत्यक्षात पाहतो. इटुकल्या पिटुकल्या उंदराचा पाठलाग करणारी मांजर आणि मांजरापासून लुटूलुटू दूर पडणारा उंदीर. उंदीर हा मांजराला घाबरतो हे आपल्याला माहिती आहे. पण आता अगदी याच्या उलट व्हिडीओ व्हायरल होतो आहे. चक्क मांजर उंदराला घाबरलं आहे (Cat fear rat video). उंदीर-मांजराचा हा मजेशीर व्हिडीओ तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि हसूही आवरणार नाही. एरवी उंदराची शिकार करण्यासाठी त्याच्यामागे पळणारं मांजर उंदरापासून दूर पळताना दिसलं. उंदरासमोर वाघाचीही मावशीही भीगी भिल्ली झाली. असं नेमकं काय झालं की चक्क एक मांजर उंदराला घाबरलं ते पाहुयात.व्हिडीओत पाहू शकता एक मांजर रस्त्याच्या कडेला शांत बसलं आहे. तिच्यासमोरून एक उंदीर येतो. आता मांजराच्या स्वभावाप्रमाणे या मांजराने त्या उंदरावर हल्ला करणं अपेक्षित होतं. पण उलटंच घडलं. मांजर त्या उंदराला घाबरताना दिसलं. उंदरापासून आपला जीव वाचवताना दिसलं. हे वाचा - हा तर देशी स्पायडरमॅन! तरुणाचं टॅलेंट पाहून नेटिझन्स थक्क; पाहा VIRAL VIDEO उंदीर मांजरासमोर आला आणि तिच्यासमोर येऊन उभा राहिला. मांजर इतकं घाबरलं की तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून ते आपल्या जीवासाठी उंदरासमोर याचना करत आहे, असंच दिसून येतो. उंदरालाही दया येतं आणि ते मांजराला सोडून देतं. तिथून पुढे निघून जातं. तेव्हा कुठे मांजराच्या जीवात जीव येतो.
आता मांजर उंदराला घाबरण्याचं काय हे व्हिडीओ पाहून तुम्हाला समजलंच असेल. उंदीर मांजराच्या आकारापेक्षा मोठा आहे. इतका मोठा उंदीर पाहून मांजरही हैराण होतं. हे वाचा - कसं शक्य आहे? तेलाऐवजी पाण्यात बनवलं Omelette; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सही हैराण झाले आहेत. कुणी मांजराची अवस्था पाहून तर कुणी इतका मोठा उंदीर पाहून. cats_usa नावाच्या इन्सटाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला कॅप्शन द्या असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं, यावर काय कॅप्शन सुचतं हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.