JOIN US
मराठी बातम्या / Viral / वधू वरांच्या 'या' Video ने वेधलं लक्ष, तुम्हीही पाहून कराल कौतुक

वधू वरांच्या 'या' Video ने वेधलं लक्ष, तुम्हीही पाहून कराल कौतुक

असं म्हणतात, की शरीर ही निसर्गाची देणगी असते. प्रत्येक व्यक्तीचा बांधा, रंग आणि उंची वेगळी असते. काही जण ताडामाडासारखे उंच होतात, तर काही जणांची उंची निसर्गत:च कमी असते.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 मार्च : असं म्हणतात, की शरीर ही निसर्गाची देणगी असते. प्रत्येक व्यक्तीचा बांधा, रंग आणि उंची वेगळी असते. काही जण ताडामाडासारखे उंच होतात, तर काही जणांची उंची निसर्गत:च कमी असते. इतकी कमी, की त्यांना इतरांकडून चेष्टेचा किंवा टोमण्यांचा समाना करावा लागतो. कमी उंचीच्या व्यक्तींना आयुष्याचा जोडीदार शोधतानाही फार अडचणी येतात. राजस्थानात जोधपूरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीनेही असाच काहीसा विचार केला होता. तिची उंची एखाद्या चार-पाच वर्षांच्या मुलाइतकी असल्यामुळे आपल्याला आयुष्यात कधीही जोडीदाराचं प्रेम मिळणार नाही, असा विचार करून ती निराश झाली होती; मात्र तिच्या आयुष्यात अचानक तिच्यासारख्याच एका मुलाची एंट्री झाली आणि दोघांनी लग्न केलं. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ नावाच्या फेसबुक पेजने त्यांच्या लव्हस्टोरीची गोष्ट आणि व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’च्या फेसबुक पोस्टमधल्या माहितीनुसार, 23 वर्षांची ही तरुणी लहानपणापासून आपल्या उंचीमुळे चेष्टेचा विषय ठरत होती. आपल्याला कधीच प्रेम मिळणार नाही, असं तिला वाटत होतं. तिच्या आईजवळ ही खंत तिनं कित्येकदा बोलूनही दाखवली होती; मात्र अचानक उदयपूरमधला ऋषभ नावाचा मुलगा तिच्या आयुष्यात आला आणि तिचं आयुष्य बदलून गेलं. एका जवळच्या नातेवाईक महिलेनं या मुलीसाठी ऋषभचं स्थळ सुचवलं होतं. त्याचीदेखील उंची फारच कमी होती. या मुलीच्या आईने ऋषभची भेट घेतली. त्यानंतर ऋषभच्या कुटुंबीयांनीदेखील या मुलीच्या घरी येऊन तिला बघितलं. दोघांची मनं जुळली आणि त्यांनी एकमेकांना एक संधी देण्याचा निर्णय घेतला.

दोघांच्या पहिल्या भेटीबाबत ही तरुणी सांगते, “आमच्या पहिल्या भेटीत ऋषभ काहीही बोलला नाही. मीच बडबड करत होते. पण, दुसऱ्या भेटीच्या वेळी ‘आपण एकत्र राहू शकू का?’ असा प्रश्न मी त्याला विचारला होता. त्यावर त्यानं दिलेलं उत्तर ऐकून तोच माझ्यासाठी योग्य आहे याची मला खात्री झाली. ‘काहीही झालं तरी लोक आपली चेष्टाच करतील, एकटं राहण्यापेक्षा एकत्र राहून एकत्र त्यांच्या चेष्टेचा सामना करू,’ असं तो म्हणाला होता.”

दुसऱ्या भेटीनंतर या तरुणीने ऋषभशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. साखरपुडा झाल्यानंतर वर्षभर ते एकमेकांना भेटत राहिले. या काळात त्यांची घट्ट मैत्री झाली. आता दोघांचं लग्न होऊन तीन महिने झाले आहेत. आताही काही जण त्यांची जोडी बघून त्यांची चेष्टा करतात. मात्र, आपल्याला काही फरक पडत नाही, असं ही तरुणी म्हणते. तिच्या मते, “प्रेमात असणं आणि कोणी तरी आपल्यावर प्रेम करणं, या भावनेची कशाशीही तुलना करता येणार नाही.” दोघांची लव्हस्टोरी वाचकांना फार आवडली आहे. फेसबुकवर अनेक युझर्सनी चांगल्या कमेंट्स केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या