JOIN US
मराठी बातम्या / Viral / भारतातील 'या' भाजीची किंमत लंडनमध्ये 900 रुपये, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

भारतातील 'या' भाजीची किंमत लंडनमध्ये 900 रुपये, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

सध्या प्रत्येकजण वाढत्या महागाईचा सामना करत आहे. अशा स्थितीत आपला देश सोडून परदेशात राहणं आणखी कठीण आहे.

जाहिरात

व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 एप्रिस : सध्या प्रत्येकजण वाढत्या महागाईचा सामना करत आहे. अशा स्थितीत आपला देश सोडून परदेशात राहणं आणखी कठीण आहे. कारण तिथं तुमच्या हिशोबानुसार प्रत्येक वस्तू मिळू शकत नाही. जे पदार्थ तुम्ही तुमच्या देशात रोज खाता, ते तुम्हाला परदेशात गेल्यावर विसरावे लागतात. स्वदेशी पदार्थांची गोष्ट तर काही औरच आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीबाबत असाच काहीसा प्रकार घडला. त्याचा हा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला परवलची भाजी खाण्याची खूप इच्छा झाली. पण तो खाऊ शकला नाही. यामागे नेमके कोणते कारण आहे, जाणून घेऊया.

ट्विटरवर ओंकार खांडेकर नावाच्या व्यक्तीनं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लंडनच्या एका मार्केटमधील काही भाज्यांचे फोटो आहेत. त्यात हिरवी मिरची, टोमॅटो, भेंडी, कारलं आणि परवल दिसत आहे. पण जेव्हा या भाज्यांच्या किंमती तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला धक्का बसेल. या मार्केटमध्ये एक किलो परवलचा दर 8.99 पाउंड होता. हा दर भारतीय चलनानुसार सुमारे 919 रुपये होतो. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ओंकार खांडेकर यांनी हे लिहिलं आहे. ते लिहितात, ``लंडन खूप चांगलं आहे आणि 900 रुपये किलो परवल सोडून इथं बाकी सर्व ठीक आहे.``

संबंधित बातम्या

रोममध्ये असाल तर परवल खाऊ नका खरंतर अशी पोस्ट व्हायरल होणं साहजिकच आहे. या पोस्टनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. भाज्यांचे भाव वाचून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. त्यावर एका युजरनं कमेंट केली आहे. तो लिहितो, ``रोममध्ये असाल तर परवल अजिबात खाऊ नका.`` दुसरा एक युजर कमेंट करताना लिहितो, ``त्या परवलची चव काही खास नसेल.`` हेही वाचा -  जमिनीखाली सोनं आहे कसं कळतं? काय आहे ती टेक्नॉलॉजी भारत भाज्यांची जगभरात करतो निर्यात भारतात सर्व ऋतुंमध्ये हिरव्या आणि ताज्या भाज्या मिळतात. कारण देशात वर्षभर भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. भारतातून परदेशात अनेक भाज्या निर्यात केल्या जातात. अन्न आणि कृषी संघटना अर्थात एफएओच्या आकडेवारीनुसार, बटाटा, कांदा, फ्लॉवर, वांगी, कोबी आदी भाज्यांच्या उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापैकी विविध भाज्या जगभरात निर्यात केल्या जातात. त्यामुळे अनेक देशांमध्ये भारतीय भाजीपाला उपलब्ध होतो. मात्र त्याच्या किंमती तेथील मार्केटमध्ये तुलनेनं जास्त असतात. ओंकार खांडेकर यांची ही भाज्यांच्या दरांविषयीची पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या निमित्ताने लंडनच्या मार्केटमधील भारतीय भाज्यांचे दरही लोकांना माहिती झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या