तुम्ही कधी विचार केलाय का की आपण घालत असलेलं सोनं कुठून आणि कसं काढलं जातं. जमिनीच्या खोलात असलेलं सोनं कसं ओळखलं जातं याविषयी जाणून घेऊया. सोनं काढण्यासाठी दोन संस्था काम करतात. ऑर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. (ASI आणि GSI) जमिनीखालंचं सोनं काढण्यासाठी ग्राऊंड पेनीट्रेटिंग रडार (GPR) आणि व्हेरी लो फ्रीक्वेंसी (VLF) वापरली जाते. GRP मध्ये मातीच्या भौतिक गुणांची चाचणी केली जाते. VLF द्वारे जमिनीत तरंग पाठवले जातात. तरंगे मेटलला धडकल्यावर जो आवाज होतो त्यावरुन कळतं की जमिनीच्या खाली कोणती तत्वे किंवा धातू आहेत.