JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'रॉयल' अंदाजात लॉक तोडून चावीशिवाय सुरू केली बुलेट; चोरीची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले, VIDEO

'रॉयल' अंदाजात लॉक तोडून चावीशिवाय सुरू केली बुलेट; चोरीची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले, VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पोलिसांनी या चोराला पकडलं आणि नंतर त्याला गाडी कशी चोरी करतो, हे सर्वांसमोर दाखवायला सांगितलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 14 मार्च : भारतात बहुतेक लोकांना रॉयल इनफिल्ड (Royal Enfield) बुलेट चालवायला आवडते. अगदी गल्लीपासून ते पर्वतांवर फिरायला जाणाऱ्या लोकांपर्यंत सगळीकडेच तुम्हाला बुलेटचे चाहते पाहायला मिळतील. मात्र या गाडीचं वजनही तितकंच जास्त असतं, त्यामुळे ती चालवणं प्रत्येकालाच शक्य नसतं. अगदी चोरांचेही डोळे बुलेटवरच असतात. आजकाल सतत अशा बातम्या समोर येत राहातात ज्यात चोर काही मिनिटांतच बुलेट चोरी करून फरार होतात आणि तो पोलिसांच्या तावडीत सापडतही नाहीत. Shocking! उंच डोंगरावर उभा राहून घेतली उडी; तरुणाचा VIDEO पाहून संतापले नेटकरी सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. यात पोलिसांनी एका बुलेट चोरणाऱ्या व्यक्तीला पकडलं. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पोलिसांनी या चोराला पकडलं आणि नंतर त्याला गाडी कशी चोरी करतो, हे सर्वांसमोर दाखवायला सांगितलं.

संबंधित बातम्या

हा चोर (Boy Steal Bullet) चोरीची स्टाईल दाखवण्यासाठी शेजारी उभा असलेल्या बुलेटजवळ जातो. काहीच सेकंदात तो या गाडीचं लॉक तोडतो. इतकंच नाही तर तो चावीशिवायच ही गाडी सुरूही करतो. तो बुलेटच्या हँडलजवळ असलेल्या काही वायर तोडून त्या डायरेक्ट करतो. यामुळे गाडी एकदा बटण दाबताच सुरू होते. हे पाहून तिथे उपस्थित पोलिसही हैराण होतात. पकडल्या गेलेल्या या चोराची चोरीची पद्धत पाहून सगळेच थक्क झाले.

चिमुकलीला पाहाताच चवताळली मेंढी; धावत येत केला हल्ला अन्…, धडकी भरवणारा VIDEO

अवघ्या एका मिनिटात या चोराने बुलेटचं लॉक तोडलं आणि गाडीही चावीशिवाय सुरू केली. हे पाहून सगळेच थक्क झाले. म्हणजेचच या चोरासाठी बुलेट चोरणं ही काही मोठी गोष्ट नव्हती. त्यामुळे तुम्हाला तुमची गाडी सुरक्षित ठेवायची असेल तर ती सुरक्षित ठिकाणी आणि सर्व काळजी घेऊन पार्क करणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर memewalanews नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या