JOIN US
मराठी बातम्या / Viral / 5 पैकी कोणता पंख निवडाल? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या व्यक्तीमत्वाचं गुढं

5 पैकी कोणता पंख निवडाल? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या व्यक्तीमत्वाचं गुढं

या पंखांमधील तुम्हाला एक पंख निवडायचा आहे, ज्यामुळे तुमच्या स्वभावाचं गुपित उघडं होईल.

जाहिरात

सोर्स : गुगल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : माणसाच्या आयुष्यात असा वारंवार प्रसंग येतो, जेव्हा त्याला कोणत्याही दोन, तीन किंवा त्याहून जास्त पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करावी लागते. हा प्रसंग माणसासाठी सर्वात कठीण असतो, कारण त्याचे जे काही चांगले वाईट परिणाम होतील, ते त्या व्यक्तीलाच भोगायचे असतात. व्यक्ती कोणता पर्याय निवडतो किंवा त्याचा आयुष्यावर किती परिणाम होतो यावरुन त्या व्यक्तीची बुद्धमत्ता आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन लक्षात येतो असे म्हणतात. आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही पर्याय घेऊन आलो आहोत, ज्यामधून तुम्हाला एकच पर्याय निवडायचा आहे. हे पंख आहेत, ज्यामधील तुम्हाला एक पंख निवडायचा आहे, ज्यामुळे तुमच्या स्वभावाचं गुपित उघडं होईल. घराच्या बाहेर दररोज यायचा विचित्र वास, CCTV तपासताच समोर आलं धक्कादायक सत्य या चित्रात पाच पंख बनवले आहेत. सर्व पंख एकमेकांपासून वेगळे आहेत. तुम्हाला या पाच पंखांपैकी कोणताही एक निवडावा लागेल. तुम्ही कोणताही पंख निवडाल, त्या आधारे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं गुपित समोर येईल. आधी एक पंख मनात ठरवा आणि मग बातमी स्क्रोल करुन उत्तर पाहा . . . . पहिला पंख : द माइंड जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, जर तुम्ही पहिला पंख निवडला असेल, तर तुम्ही अशा लोकांपैकी एक आहात ज्यांना शांतता आवडते. ज्यामुळे ते अहिंसा पसंत न करणाऱ्या लोकांपैकी असतात. तुम्ही खूप चांगले मित्र आणि दयाळू व्यक्ती आहात. तुम्ही तुमच्या आजूबाजूला सुसंवादाचे वातावरण निर्माण करता. त्याच वेळी, तुम्ही नियमांचे पालन करणाऱ्या लोकांमध्ये देखील तुम्ही आहात. दुसरा पंख : जर तुम्ही दुसरा पंख निवडला असेल, तर तुम्ही अशा लोकांपैकी आहात जे प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करतात. तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देता. शिवाय, तुम्ही एक चांगले श्रोते देखील आहात. त्याच वेळी, तुम्हाला गोष्टी लवकर आठवतात. तुम्ही नवीन गोष्टीही पटकन शिकता. लोकांना तुमच्याकडून सल्ला घ्यायला आवडते. तुम्हाला नवीन परिस्थितीमध्ये ऍडजस्ट करण्यात कोणतीही अडचण येत नाही. तुम्ही तुमच्या गोष्टी लोकांशी सहज शेअर करू शकत नाही. तिसरा पंख : तुम्हाला स्वतंत्र राहायला आवडते. त्याच वेळी, तुम्ही तुमच्या ध्येयांवर खूप लक्ष केंद्रित करता. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करता. कोणत्याही परिस्थितीत ध्येय गाठणे ही तुमची खासियत आहे. तुम्ही अपयशाने खचून जात नाही, उलट तुम्ही तुमच्या अपयशांना अनुभव म्हणून पाहता. त्याचबरोबर तुमच्यात नेतृत्वगुणही आहेत. चौथा पंख : तुम्ही कोणतीही समस्या सहज सोडवता. जेव्हा एखादी समस्या तुमच्यासमोर येते, तेव्हा ती हाताळण्यासाठी तुमच्याकडे एक नवीन आणि सर्जनशील कल्पना असते. त्याच वेळी, तुम्हाला फसवणे सोपे नाही. तुमचे व्यक्तिमत्त्व तुमच्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेते. तथापि, तुमचे व्यक्तिमत्त्व अनेकांना मूडी व्यक्तीसारखे वाटू शकते. पण, जेव्हा कोणी तुमच्याशी बोलेल तेव्हा तो फक्त तुमच्या व्यक्तिमत्त्वाची प्रशंसा करतो.

पाचवा पंख : तुमच्याकडे कलात्मक स्वभाव आणि सर्जनशील स्वभाव आहे. त्याच वेळी, आपल्याला प्रत्येक लहान गोष्टी लक्षात येतात. तुमचा संवेदनशील स्वभाव तुमच्या आत्मविश्वासाबाबत समस्या निर्माण करतो आणि इतरांवर आंधळेपणाने विश्वास ठेवल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. तुम्हाला अपयशाची भीती वाटते. तुम्हाला तुमच्या या भीतीवर काम करण्याची गरज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या