JOIN US
मराठी बातम्या / Viral / बेड आणि कपडे शेअर करणाऱ्या जुळ्या बहिणींची तऱ्हाच न्यारी, आता हेही केलं शेअर

बेड आणि कपडे शेअर करणाऱ्या जुळ्या बहिणींची तऱ्हाच न्यारी, आता हेही केलं शेअर

जगभरात अनेक जुळी बहिण-भावंडे असतात. एकत्र जन्माला आल्यामुळे त्यांच्यामध्ये सहसा बरंच साम्य पहायला मिळतं. त्यांच्यामध्ये बाकी बहिण भावांपेक्षा जास्त जवळीक दिसून येते.

जाहिरात

व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : जगभरात अनेक जुळी बहिण-भावंडे असतात. एकत्र जन्माला आल्यामुळे त्यांच्यामध्ये सहसा बरंच साम्य पहायला मिळतं. त्यांच्यामध्ये बाकी बहिण भावांपेक्षा जास्त जवळीक दिसून येते. काहींचे तर चेहरेही एकसारखे असतात. बऱ्याचदा त्यांना ओळखण्यातही लोकं फसतात. एकसारखे कपडे घालणे, सोबत जेवणे, एक बेड शेअर करणे, सोबत फिरणे अशा जुळ्यांच्या गोष्टी असतात. मात्र एका जुळ्या बहिणींनी तर हद्दच केलेली पहायला मिळाली. त्यांनी नक्की काय केलं हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जुळ्या बहिणींनी त्यांचा प्रेमी देखील एकमेकींशी शेअर केल्याची घटना समोर आली आहे. काही काळापासून, ऑस्ट्रेलियाच्या जुळ्या बहिणी अॅना आणि लुसी डेसिंक खूप प्रसिद्ध होत आहेत. 35 वर्षांच्या बहिणी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या कारण त्यांनी लोकांसमोर त्यांच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला होता. दोघांचेही एकाच माणसावर प्रेम होते आणि या गोष्टीवर त्यांचा काहीही आक्षेप नव्हता. अलीकडेच, दोन्ही बहिणी दिस मॉर्निंग नावाच्या टीव्ही शोमध्ये आल्या होत्या, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक मोठे रहस्य सर्वांना सांगितले. तेव्हापासून सर्वत्र त्यांचीच चर्चा दिसत आहे. हेही वाचा -   जगातील 5 देश जिथे महिला दोन पती ठेवू शकतात, काय आहे कायदा? बहिणींनी आधीच खुलासा केला होता की त्यांचा एकच बॉयफ्रेंड आहे ज्याला त्या शेअर करतात आणि दोघींनाही त्याच्याकडून मूल हवे आहे. दोघींनाही एकत्र आई होण्याची इच्छा आहे. पण या शोमध्ये येताना त्याने आपल्या निर्णयाचे कारणही सांगितले. ती म्हणाली की त्या एकमेकांशिवाय जगू शकत नाही, म्हणून त्यांना सर्वकाही एकत्र अनुभवायचे आहे.

दरम्यान, जुळ्या बहिण-भावांचे अनेक किस्से समोर येत असतात. मजेशीर व्हिडीओही अनेकदा सोशल मीडियावर पहायला मिळतात. मात्र दोघी बहिणी आपल्या प्रियकराला शेअर करतात हे क्वचितच पहायला मिळतं. सध्या अॅना आणि लुसी डेसिंक त्यांच्या लव्ह लाईफच्या निर्णयामुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या