नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : महिला पुरुष एकमेकांसोबत लग्न करुन आपलं जीवन व्यतीत करत असतात. अनेक ठिकाणी पती एकापेक्षा जास्त पती करताना दिसून येतात. मात्र भारतात एकापेक्षा जास्त पती असणे बेकायदेशीर मानले जाते. मात्र असाही एक देश आहे जिथे पत्नी दोन पती ठेवू शकतात. पुरुषांच्या एकापेक्षा अधिक बायका असतात हे ऐकलं असेल पण महिलांचा प्रश्न आल्यावर सर्वच आश्चर्यचकित होतात. मात्र जगभरात असेही पाच देश आहेत जिथे महिला एकापेक्षा जास्त पती ठेवू शकतात. असेही काही देश आहेत जिथे महिलांना दुसरे लग्न करण्यास काहीही बंधन नाही. यामध्ये कोण-कोणत्या देशांचा समावेश आहे याविषय जाणून घेऊया. हेही वाचा - सनबाथ घेणाऱ्या बिकीनी गर्लला सापानेच फोडला घाम, हळूच मांडीवर चढला आणि….पाहा Video नेपाळ - जरी नेपाळमध्ये बहुपत्नीत्वावर बंदी घालण्यात आली असली तरी हुमला, डोल्पा आणि कोसी सारख्या भागात बहुपत्नीत्व अजूनही चालू आहे. येथे महिला त्यांच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त विवाह करू शकतात. यावर कोणताही कायदा महिलांना रोखू शकत नाही. भारत - तोडा, निलगिरी, त्रावणकोरचे नायर, उत्तराखंडचे जौनसार बावर, अरुणाचल प्रदेशचे गेलॉंग, केरळचे माला मालेसर इत्यादी ठिकाणी ही प्रथा आजही कायम आहे. येथील महिलांना एकापेक्षा जास्त विवाह करण्याचा अधिकार आहे. महिलांनी एकापेक्षा जास्त तरुणांशी लग्न केल्यास त्यांना रोखले जात नाही, तर त्यांचे लग्न पुन्हा मोठ्या थाटामाटात केले जाते. हेही वाचा - Shocking Video : ब्रेकऐवजी चुकून दाबला एक्सीलेटर अन् तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार नायजेरिया - या ठिकाणी अशा जमाती आहेत ज्या बहुपत्तींना परवानगी देतात. उत्तर नायजेरियाच्या इरिग्वेमध्ये आजही स्त्रिया एकापेक्षा जास्त पतीशी लग्न करतात. केनिया - केनियामध्ये मसाई जमाती मोठ्या संख्येने राहतात. येथे बहुपत्नीत्वाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात आढळतात. येथे महिला एकापेक्षा जास्त पतीशी विवाह करतात. हा ट्रेंड खूप जुना आहे.
चीन - चीनमध्ये जरा वेगळी परंपरा कायदा दिसून येतो. चीनच्या तीबेट प्रदेशात एक महिला अनेक भावांशी लग्न करु शकते. अशा घटना कायम पहायला मिळतात. पण स्त्रिया कोणतं मूल कोणत्या नवऱ्याचं आहे कोणालाही सांगत नाही.