व्हायरल
नवी दिल्ली, 8 एप्रिल : जंगलातील वन्य प्राणी, वन्य जीवनाविषयी अनेकांना कायमच उत्सुकता असते. जेवढं प्राण्यांना पाहणं उत्सुकतेचं असतं तेवढंच भयानकही. कारण जंगलामध्ये अनेक भयानक प्राणी राहतात आणि कोण कधी हल्ला करेल याचा काही नेम नाही. जंगलातील भयंकर शिकारी अशक्त प्राण्यांना आपली शिकार बनवून आपलं पोट भरत असतात. यापैकी सिंह, वाघ, बिबट्या अव्वल शिकारी आहेत. अशातच शिकारीचा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये भयंकर शिकारीच शिकार ठरल्याचं पहायला मिळालं. वन्यजीवांचे असे दुर्मिळ दृश्य सोशल मीडियावर पहायला मिळते ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. ट्विटरवर वन्यजीव छायाचित्रकार हर्ष नरसिंहमूर्ती यांनी राजस्थानच्या रणथंबोर नॅशनल पार्कचे असे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले, जिथे एक वाघ बिबट्यासारख्या भयानक शिकारीचा शिकार करत आहे. IFS अधिकारी परवीन कासवान यांनी हा 1 वर्ष जुना फोटो पुन्हा शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
नॅशनल पार्क हे एक असे जंगल आहे जिथे लोक दुरदुरून भयानक प्राणी पाहण्यासाठी येतात. जिथे एका फोटोग्राफरला असे दृश्य पाहायला मिळाले, जे त्याला आयुष्यभर लक्षात राहील. हर्षा नरसिंहमूर्ती यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये वाघ बिबट्याची शिकार करून बसला होता आणि जंगलाच्या एका भागात एकटाच मजा घेत होता. तो बिबट्याचे मांस तृप्त होऊन चाखत होता. हे दुर्मिळ दृश्य हर्ष नरसिंहमूर्ती यांनी कॅमेऱ्यात टिपलं आहे.
दरम्यान, याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. हा व्हिडीओ आणि फोटो सध्या चांगलेच व्हायरल होताना दिसतायेत. दोन्ही पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंटचाही वर्षाव होताना दिसतोय.