स्विमिंग पुलमधील मजामस्ती आली अंगलट
नवी दिल्ली, 15 मे : उन्हाळा सुरु असून सर्वत्र गरमीनं सर्वांना हैराण करुन सोडलं आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे लोक थंड ठिकाणाच्या शोधात फिरायला जातात. पाण्याच्या ठिकाणी आपला जास्त वेळ व्यतीत करताना दिसून येतात. अशातच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्य लोक स्विमिंग पूलमध्ये मजा मस्ती करत आहे. तेवढ्यात असं काही घडतं की व्यक्तीची मान थोडक्यात बचावते. नुकताच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती खोडकरपणा करत आहे. मात्र अचानक त्याच्यासोबत नको ते घडतं मात्र तो त्या अपघातातून थोडक्यात बचावतो. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, स्विमिंग पूलच्या आत बांधलेल्या वॉटर स्लाइडच्या तोंडाजवळ एक माणूस उभा असल्याचं दिसत आहे. ज्यामधन एक व्यक्ती घसरत येते आणि पाण्यात पडते. व्यक्तीपासून वाचण्यासाठी स्लाईडसमोर असलेला व्यक्ती पाण्याखाली जातो. त्यानंतर पाण्याच्या वर येताच दुसरा व्यक्ती स्लाईडमधून घसरत येतो ज्यामुळे या व्यक्तीसोबत अपघात घडतो. यामध्ये दिसत आहे की त्याच्या मानेला वाईटरित्या लागलं. तरीही या गंभीर अपघातातून त्याची मान थोडक्यात बचावते.
दरम्यान, @1000waystod1e नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून यावर भरपूर कमेंट येत आहेत. उन्हाच्या तीव्र लाटेपासून वाचण्यासाठी लोक विविध ठिकाणी एन्जॉय करायला जात आहेत. मात्र आनंद लुटण्याच्या नादात अनेकांसोबत विचित्र घटना घडतानाही समोर येत आहे. त्यामुळे मजा मस्ती करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.