JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral : चक्क सारस पक्षी झाला युवकाचा दोस्त! कशी सुरु झाली अनोखी मैत्री?

Viral : चक्क सारस पक्षी झाला युवकाचा दोस्त! कशी सुरु झाली अनोखी मैत्री?

गेल्या सुमारे एक वर्षापासून सारस आरिफसोबत राहतो. आरिफ कुठेही गेला तरी सारस त्याचा सारथी बनून त्याच्याशी असलेलं मैत्रीचं नातं जपत आहे. आरिफ आणि सारस यांच्यातील मैत्री पाहिल्यानंतर प्रत्येकजण त्यांच्या नात्याचं उदाहरण देत आहेत.

जाहिरात

चक्क सारस पक्ष्याशी युवकाशी घट्ट मैत्री; कशी सुरु झाली अनोखी दोस्ती?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमेठी, 21 फेब्रुवारी: आयुष्यात मित्र असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या प्रमाणे नातेवाईक आवश्यक आहेत, त्याचप्रमाणे मित्र असणंदेखील गरजेचं आहे. उत्तर प्रदेशातील अमेठीतील एका 30 वर्षांच्या तरुणाचा मित्र हा कोणी माणूस नसून, उत्तर प्रदेशचा राज्यपक्षी सारस हा आहे. वास्तविक आरिफ नावाच्या या तरुणाने जखमी सारसला मदत केली होती. त्यानंतर आरिफ आणि सारसामध्ये मैत्रीचं घट्ट नातं तयार झालं. गेल्या सुमारे एक वर्षापासून सारस आरिफसोबत राहतो. आरिफ कुठेही गेला तरी सारस त्याचा सारथी बनून त्याच्याशी असलेलं मैत्रीचं नातं जपत आहे. आरिफ आणि सारस यांच्यातील मैत्री पाहिल्यानंतर प्रत्येकजण त्यांच्या नात्याचं उदाहरण देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमेठी जिल्ह्यातील जामो विकासखंडमधील मंडका गावातील रहिवासी आरिफसोबत सारस हा मित्र म्हणून राहत आहे. ऑगस्ट 2022 मध्ये जखमी झालेल्या सारसाची जीवन-मरणाशी लढाई सुरू होती. अशा कठीण काळात आरिफने सारसाचा जीव वाचवला आणि पक्ष्यांविषयी असलेलं आपलं प्रेम दाखवून दिलं. जवळपास एक वर्षापासून सारस आरिफ आणि त्याच्या कुटुंबात एकोप्यानं राहतो. हेही वाचा:  पुणेरी पाट्यांना टक्कर; ‘जे मूर्ख नाहीत त्यांना नोकऱ्या!’ पिझ्झा शॉपसमोरील बोर्ड पाहून बेरोजगार हैराण! आरिफसोबत कायम असतो सारस- विशेष म्हणजे, हा सारस आरिफच्या घरात राहतो तसंच कायम त्याच्यामागे सावलीसारखा असतो. आरिफ कुठेही गेला तरी तो त्यासोबत असतो. आरिफ पायी जात असो वा बाईकवर, सारस आरिफसोबत त्याचा सोबती म्हणून जातो. सारस पक्षी आणि आरिफ यांच्यात एक जिव्हाळ्याचं नातं तयार झालं आहे. आरिफच्या कुटुंबात त्याची पत्नी, दोन मुलं आणि आई-वडिल आहेत. हे सर्वजण सारस पक्षाला कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे सांभाळतात.

जखमी सारसाचे प्राण वाचविण्यासाठी आरिफने केली होती मदत- आरिफने `न्यूज 18 लोकल`शी बोलताना सांगितले की, ``या सारस पक्ष्याचा पाय मोडला होता. मला तो शेतात जखमी अवस्थेत आढळून आला. त्यानंतर मी त्याच्यावर उपचार करुन त्याला घरी आणले आणि खाऊ घातले. तेव्हापासून हा सारस मला त्याचा खरा मित्र मानतो आणि तो फक्त माझ्यासोबत राहतो. या पक्षाने मोकळ्या आकाशात पुन्हा भरारी घ्यावी, अशी आमची इच्छा होती. पण तो आमच्यापासून दूर गेला नाही. आमची मैत्री इतकी घट्ट आहे की मी कुठेही गेलो तरी तो माझ्यासोबत असतो. तो आमच्यासोबतच घरी येतो. तो पूर्णपणे मुक्त आहे. त्याला कोणत्याही प्रकारे आम्ही बंधनात ठेवलेलं नाही. दिवसभर आकाशात भ्रमंती केल्यानंतर तो सायंकाळी घरी परत येतो. हा सारस पक्षी आमच्या कुटुंबातील एक सदस्य बनला आहे. ``

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या