JOIN US
मराठी बातम्या / Viral / चिकू सफरचंद टाकून बनवला चहा, Video पाहून लोक म्हणाले...

चिकू सफरचंद टाकून बनवला चहा, Video पाहून लोक म्हणाले...

जगभरात चहाप्रेमींची काही कमतरता नाही. अनेकांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवटही चहापासून होतो. त्यामुळे अनेक जण चहा हा एक नशाच असल्याचं म्हणतात.

जाहिरात

चहाचे फ्युजन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 मे : जगभरात चहाप्रेमींची काही कमतरता नाही. अनेकांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवटही चहापासून होतो. त्यामुळे अनेक जण चहा हा एक नशाच असल्याचं म्हणतात. चहाप्रेमींच्या चहाला कोणती वेळ नसते मात्र त्यांना वेळेला चहा हवाच. आजकाल तर चहामध्येही नवनवीन व्हरायटी पहायला मिळत आहे. विक्रेते वेगळ्या आणि हटके प्रकारच्या चहा बाजारात आणत आहेत. अशातच एक व्यक्ती चहामध्ये फळे मिसळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भांड्यात चहा बनवला जात आहे आणि बनवणारा व्यक्ती त्यात चिरलेला चिकू, सफरचंद किसून त्यात मिसळत आहे. त्यानंतर तो चहा गाळून कपात देतो. लोक जेवणात वेगवेगळे प्रयोग करत राहतात तसा चाहवाल्यानेही हा प्रयोग करुन बघितल्याचं पहायला मिळत आहे.

कधी ते मँगो पिझ्झा बनवतात तर कधी मसाला जिलेबी बनवून सर्वांना आश्चर्यचकित करतात, पण चहासोबत असा विचित्र प्रयोग तुम्ही क्वचितच पाहिला असेल. लोक सफरचंदाचा रस पितात, पण सफरचंद घातल्यावर चहा कोण पितं? चिकू आणि सफरचंदसोबतच्या या विचित्र चहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

delhifoodcrush नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरपूर कमेंट येताना दिसत आहे. चहासोबत असा प्रकार अनेकांनी पहिल्यांदाच पाहिला असेल. त्यामुळे काहींना हे आवडलं तर काहींनी यावर राग व्यक्त केला. त्यामुळे एकंदरीत व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ अगदी थोड्याच वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाला. यापूर्वूही खाण्याच्या प्रकारामध्ये खूप प्रकार समोर आले. अनेकांनी कशापासूनही फूड फ्युजन बनवलं. त्यामुळे आता फूड फ्युजनवर लोक संताप व्यक्त करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या