JOIN US
मराठी बातम्या / Viral / हे तुमच्यासोबतही घडू शकतं! जीवन-मृत्यूमधील 'ती' 10 मिनिटं; थरकाप उडवणारा VIDEO

हे तुमच्यासोबतही घडू शकतं! जीवन-मृत्यूमधील 'ती' 10 मिनिटं; थरकाप उडवणारा VIDEO

एका पार्कमध्ये हसता-खेळता, आनंद-मजा लुटताना अचानक कित्येक लोकांना समोर मृत्यू दिसला.

जाहिरात

हवेत लटकले लोक.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीजिंग, 22 जानेवारी : जेव्हा मृत्यू जवळ येतो किंवा मृत्यू समोर दिसतो तेव्हा काय वाटतं. मृत्यूपूर्वी नेमकं काय होतं. जीवन आणि मृत्यूच्या मध्ये काय घडतं? असे एक ना दोन किती तरी प्रश्न कित्येकांना पडतात. फक्त मरणाच्या दारात असलेल्याच नव्हे तर प्रत्येकाला जीवन-मृत्यूमधील भयावह दृश्य दाखवणारा हा व्हिडीओ. जो सोशल मीडिया वर तुफान व्हायरल होतो आहे.

चीनच्या अनंहुई प्रांतातील फुयांग शहरात भयंकर घटना घटली आहे. एका अम्युझमेंट पार्कमध्ये काही लोकांचा मृत्यूशी सामना झाला.  हसता-खेळता, आनंद-मजा लुटताना अचानक कित्येक लोकांसमोर मृत्यू येऊन उभा राहिला. धरतीपासून दूर उंच आकाशाजवळ गेलेला झुला तिथं गेला आणि तिथंच बंद पडला. लोक मधोमध अडकले. धरती आणि आकाशाच्या मधोमध आपला जीव मुठीत धरून बसले होते. त्यातही धक्कादायक म्हणजे हे सर्व लोक झुल्यावर उलटे लटकलेले होते.

हे वाचा -  VIDEO - तरुणाने चालत्या मेट्रो ट्रेनचा हातानेच उघडला दरवाजा आणि…; पुढे जे घडलं ते धक्कादायक

संबंधित बातम्या

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता हे दृश्य पाहून तुम्हालाही धडकी भरले. झुल्यावर अडकलेले लोकच नव्हे तर तुम्हाला तुमच्यासमोर मृत्यूच दिसेल. इतकं हे भयानक आहे.

पार्कमधील कर्मचाऱ्यांनी सर्व प्रयत्न करून पाहिले पण झुला सुरूच होईना. बऱ्याच प्रयत्नांनंतर अखेर अधिकाऱ्यांनी झुल्यावर चढून तो ठिक करण्याचा निर्णय घेतला. अखेर 10 मिनिटांनी झुला सुरू झाला तेव्हा कुठे सर्वांच्या जीवात जीव आला.

जाहिरात

अशा मनोरंजन पार्कमध्ये घडलेली ही पहिली घटना नाही. याआधीही अशा काही घटना समोर आल्या आहेत. मोठमोठ्या राइड्सच्या दुर्घटना घडल्या आहेत. काही प्रकरणात तर लोकांचा मृत्यूही झाला आहे.

हे वाचा -  चक्क सापाला KISS करायला गेला तरुण; असा चावला की… थरकाप उडवणारा VIDEO

सुदैवाने या प्रकरणात काही जीवितहानी झाली नाही. पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईल असं नाही. या लोकांचा जीव वाचला.

जाहिरात
जाहिरात

पण उद्या कुणासोबतही असं काही घडू शकतं. कदाचित या जागी तुम्ही किंवा तुमची प्रिय व्यक्ती असू शकते. त्यामुळे अशा राइडमध्ये बसताना सावधान,  काळजी घ्या. नाहीतर काय होऊ शकतं, हे तुम्ही इथं पाहिलंच.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या