JOIN US
मराठी बातम्या / Viral / अचानक बैलाने व्यक्तीवर केला हल्ला, पुढे घडलं असं की...धोकादायक Video

अचानक बैलाने व्यक्तीवर केला हल्ला, पुढे घडलं असं की...धोकादायक Video

प्राणी खूप भयानक आणि धोकादायक असतात. कधी संतापतील काही सांगता येत नाही. मग ते पाळीव असो किंवा वन्य. सोशल मीडियावर अशा प्राण्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

जाहिरात

बैलाचा व्यक्तीवर हल्ला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 जून : प्राणी खूप भयानक आणि धोकादायक असतात. कधी संतापतील काही सांगता येत नाही. मग ते पाळीव असो किंवा वन्य. सोशल मीडियावर अशा प्राण्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये संतापलेला बैल दिसत आहे. त्याच्या हल्ल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, बाजारात रहदारी सुरू आहे. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला एक बैल बांधलेला आहे. पुढच्याच क्षणी लुंगी घातलेला एक माणूस तिथून जातो. तुम्ही बघू शकता की, बैलाचा अचानक मूड बदलतो आणि मग काय तो त्याला माणसाला जोरदार टक्कर देतो. बैल वेगाने व्यक्तीवर झेपावतो आणि नंतर हवेत फेकून मारतो.

@earth.reel नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. थोड्याच वेळात व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहे. काही लोक मस्करी करत आहेत तर काहींनी व्यक्तीविषयी चिंता व्यक्त केली.

संबंधित बातम्या

दरम्यान, सोशल मीडियावर असे प्राण्यांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. प्राण्यांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर फिरत असतात. अनेकदा या हल्ल्यात लोक वाचतात तर काहींना गंभीर दुखापतही होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या