प्रतीकात्मक फोटो - Canva
वॉशिंग्टन, 01 जून : शाळेत जायला कितीही आवडत असलं तरी कधी ना कधी शाळेत जायला किंवा अभ्यासाचा कंटाळा येतो. अगदी हुशाऱातील हुशार विद्यार्थ्यासोबत असं कधी ना कधी होतं. अशा वेळी माझ्या पोटात दुखतं आहे, मला बरं वाटत नाही, असं काही ना काही बहाणा करत शाळेला दांडी मारली जाते. तुम्हीही असं केलं असेल. पण एका शाळेतील विद्यार्थ्यांनी असा प्रताप केला की तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. विद्यार्थ्यांनी चक्क शाळाच विकायला काढली आहे. त्यांनी एका रिअल इस्टेट वेबसाईटवर शाळा विक्रीची जाहिरात दिली आहे, जी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.. ही जाहिरात पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
स्क्रिनशॉटमध्ये शाळेचा फोटा आणि जाहिरातीचा मजकूर देण्यात आला आहे. ज्यात शाळेला अर्ध तुरुंग असं म्हणण्यात आलं आहे. याशिवाय शाळेत काय काय सोयीसुविधा आहेत हेसुद्धा सांगण्यात आलं आहे. सोबत त्यांनी शाळेची किंमत 34 लाखांहून अधिक लावली आहे. Shocking! School Bus च्या दरवाजात अडकली चिमुकली, ड्रायव्हरने फरफटत नेलं; लक्ष गेलं तोपर्यंत… ट्विटर पोस्टमधील माहितीनुसार अमेरिकेतील मेरिलँडमधल्या मेड हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचा हा प्रताप आहे. प्रत्यक्षात शाळा विक्रीला काढलेली नाही तर सीनिअर्सनी केलेला हा प्रँक आहे, असंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान या पोस्टवर बऱ्याच कमेंट येत आहेत. मुलांची हुशारी अनेकांना आवडली. एका युझरने शाळेचा खर्च आणखी कमी करायला हवं असं म्हटलं. तर एकाने शाळेसोबत विद्यार्थी आणि शिक्षकही मोफत मिळणार का? असा मजेशीर सवाल केला आहे. Inspiring Story : 7 वीच्या विद्यार्थिनीने लिहिलं पुस्तक, 11 वर्षांची असतानाच केला विक्रम @b3dubose ट्विटर अकाउंटवर ही पोस्ट करण्यात आली आहे.
तुम्हाला विद्यार्थ्यांचा हा प्रताप कसा वाटला, तुम्हाला शाळेचा किंवा अभ्यासाचा कंटाळा आल्यावर तुम्ही काय केलं होतं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.