मिशिगन, 12 जुलै : अमेरिकेतील मिशिनग येथील सर्वात मोठे मैदान स्फोटके लावून जमिनदोस्त करण्यात आले. अॅबर्न हिल्सच्या पॅलेस हे तीन चॅम्पियनशिप डेट्रॉईट पिस्टन संघ आणि तीन डेट्रॉईट शॉक संघांचे घर होते. जवळजवळ 30 वर्ष येथे विविध कार्यक्रम राबवले जात होते. मात्र शनिवारी हे स्टेडियम स्फोटकं लावून जमिनदोस्त करण्यात आले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एनबीए डॉट कॉमच्या म्हणण्यानुसार 1988 मध्ये या पॅलेसची निर्मिती झाली. 22,000 हून अधिक लोकं एनबीएस सामने पाहण्यासाठी जमायची तर, देशातील मोठमोठ संगीत कार्यक्रमांचे आयोजनही येथे होत होते. वाचा- बळीराजा दवाखान्यात, जनावरांसाठी खाकी गोठ्यात, पाहा हा VIDEO
वाचा- हिप्पोपोटॅमसच्या मस्तीचा VIDEO व्हायरल, एकाने अशी ओढली दुसऱ्याची शेपटी पिस्टन्सने 2017मध्ये डेट्रॉईट डाउनटाउनमध्ये स्थानांतरित केल्यानंतर येथे संगीताचे कार्यक्रम, कॉन्सर्ट यांचे आयोजन करण्यात आले. येथे शेवटचा कार्यक्रम 2017मध्ये आयोजित करण्यात आला होता. रॉकर बॉब सेगर (Bob Seger) यांची कॉन्सर्ट येथे पार पडली होती. त्यानंतर गेल्या 3 वर्षात येथे एकाही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही आहे. वाचा- बापरे! सायकलवरून तरुणानं हवेत मारली फ्लिप, VIDEO पाहून भरेल धडकी दरम्यान, य़ेथे एक नवीन विकास प्रकल्प योजनाबद्ध आहे. देशातील अनेक कंपन्या येथे गुंतवणूक करण्यास तयार आहेत. ही जागा देशातील आकर्षक जागांपैकी एक आहे. त्यामुळे लवकरच येथे एक मोठी वास्तू उभारण्यात येणार आहे.