JOIN US
मराठी बातम्या / Viral / बाबो! हिला कोणीतरी आवरा, खतरनाक डान्स पाहून प्रेक्षकही घाबरले...VIDEO

बाबो! हिला कोणीतरी आवरा, खतरनाक डान्स पाहून प्रेक्षकही घाबरले...VIDEO

सोशल मीडियावर सर्वाधिक डान्स व्हिडीओ पाहिले जातात. अनेक निरनिराळे आणि हटके प्रकारचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

जाहिरात

व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 मार्च : सोशल मीडियावर सर्वाधिक डान्स व्हिडीओ पाहिले जातात. अनेक निरनिराळे आणि हटके प्रकारचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकजण ट्रेंडिंग गाण्यांवर रील आणि शॉट्स व्हिडीओ बनवताना पहायला मिळतात. अशातच सोशल मीडियावर एक भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही काही वेळासाठी घाबरालही आणि नंतर हसूही आवरणार नाही. सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिले नाही. ते आता लोकप्रिय होण्याचे माध्यम बनले आहे. इथे कधी, कोण व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आता व्हायरल होत असलेला या महिलेचा डान्स व्हिडिओ इंस्टाग्रामवर चांगलाच खळबळ माजवत आहे, तिला इकडे तिकडे वेगाने डान्स करताना पाहून लोक घाबरले आहेत. हा व्हिडिओ एका कार्यक्रमाचा आहे जिथे बरेच लोक उपस्थित आहेत आणि गाणे वाजवून त्यांचा वेळ एन्जॉय करताना दिसत आहेत. एक स्त्री उभी राहून गाणं गाणार असं वाटतं तोच ती पुढच्याच क्षणी जोरदार डान्स करु लागते. सुरुवातीला महिलेला पाहून धक्काच बसतो नंतर हसायलाही येते. माईक हातात घेताच महिलेने जोरदार डान्स करण्यास सुरुवात केली. महिलेचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

संबंधित बातम्या

Meemlogy नावाच्या इन्स्टाग्राम हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अगदी काही वेळात हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना पहायला मिळाला. व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही पहायला मिळत आहेत. अनेक मजेशीर कमेंट व्हिडीओवर नेटकरी करत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर आत्तापर्यंत अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं असून हा व्हिडीओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या