JOIN US
मराठी बातम्या / Viral / सापाचा खतरनाक स्टंट; घराच्या उंच छतावरुन मारली उडी, घटना कॅमेऱ्यात कैद

सापाचा खतरनाक स्टंट; घराच्या उंच छतावरुन मारली उडी, घटना कॅमेऱ्यात कैद

साप हा सर्वात धोकादायक प्राणी आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी असणारा साप हा सर्वात भीतीदायक आणि भयानक आहे.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 मार्च : साप हा सर्वात धोकादायक प्राणी आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी असणारा साप हा सर्वात भीतीदायक आणि भयानक आहे. साप म्हटलं तरी अनेकांच्या मनात भीती भरते. सापाचे आत्तापर्यंत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये साप चक्क स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घराच्या छतावर एक साप बसला आहे आणि त्यानंतर त्याने असा स्टंट दाखवला, जे पाहून लोक हैराण झाले. या घटनेचा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. सापाने घराच्या छतावरुन हवेत एवढी उडी मारली. असा धोकादायक स्टंट साप केल्याचे क्वचितच पाहायला मिळते. हा व्हिडिओ IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी तिच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओवर कमेंटचा वर्षाव होतोय.

संबंधित बातम्या

सापाचे असे स्टंट व्हिडीओ फार कमी वेळा पहायला मिळतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. काही लोकांनी हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील असल्याचे सांगितले. हा व्हिडिओ दहा लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

दरम्यान, आत्तापर्यंत सापाचे अनेक व्हिडीओ समोर आलेत. मात्र या सापाच्या स्टंटने सर्वांचं लक्ष वेधलंय. सोशल मीडियावर असे व्हिडीओ काही वेळात व्हायरल होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या