स्वतःलाच चावू लागला साप
नवी दिल्ली 21 जून : जवळपास सगळ्यांना सापाची भीती वाटते. तरीही काही लोक सापासोबत खेळताना दिसतात. सापासोबत कलाबाजी करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असले तरी आता असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो तुम्हाला घाबरवेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की जखमी सापापेक्षा धोकादायक काहीही असू शकत नाही. साप स्वतःच्या शरीरावर हल्ला करू शकतो, असं तुम्हाला वाटतं का? होय, या व्हिडिओमध्ये एक साप स्वतःला चावत असल्याचं दिसत आहे. National News: चक्रीवादळाचा असाही परिणाम! एकाच रात्री 19 लोकांना सर्पदंश; परिसरात खळबळ सोशल मीडियावर अनेकदा सापांचे भयानक व्हिडिओ व्हायरल होतात. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सापाचं डोकं धडापासून वेगळं केलं आहे, परंतु असं असूनही त्याच्या शरीरात जीव कायम आहे. डोकं शरीरापासून वेगळं झाल्यानंतरही हा साप तडफडत आहे. या सापाचं कापलेलं डोकं त्याच्या शरीरापासून काही अंतरावर पडल्याचं व्हिडिओत पुढे दिसत आहे. त्यानंतर अचानक या सापाच्या मागील भागाला त्याच्या छाटलेल्या डोक्याला स्पर्श होतो. यानंतरचं दृश्य पाहून तुम्ही थक्क व्हाल.
यानंतर अचानक त्या सापाचं कापलेलं डोके जिवंत होतं आणि तो आपलं तोंड उघडून स्वतःच्या शरीराच्या मागील भागावर जोरात चावा घेतो. हे दृश्य हैराण करणारं आणि अंगावर काटा आणणारं आहे. हे संपूर्ण दृश्य एखाद्या चित्रपटाच्या चित्रीकरणासारखं वाटत असलं तरी हा व्हिडिओ खऱ्या घटनेचा आहे. तुटलेल्या डोक्यातील तोंड उघडून, साप स्वतःच्या शरीराचा मागचा भाग धरून ठेवतो आणि जोरात चावतो. हा व्हिडिओ इतका भयानक आहे की कोणीही घाबरून जाईल. सापाचं डोकं जरी कापलं तरी तो हल्ला करण्यासाठी सक्षम असल्याचं यात दिसतं.