JOIN US
मराठी बातम्या / Viral / इवल्याशा पक्षानं घडवली सापाला अद्दल; मरणाच्या दारातून अशी केली स्वतःची सुटका, पाहा VIDEO

इवल्याशा पक्षानं घडवली सापाला अद्दल; मरणाच्या दारातून अशी केली स्वतःची सुटका, पाहा VIDEO

सध्या सापाचा एक व्हिडिओ (Viral Snake Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजेल, की जर आपल्यात हिंमत असेल तर अगदी मोठं संकटही टाळता येतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 09 ऑगस्ट : आजच्या काळात सोशल मीडिया (Social Media) हे लोकांसाठी एक मनोरंजनाचं साधनच बनलं आहे. इथे दररोज एकापेक्षा एक मजेशीर आणि नवनवीन व्हिडिओ (Viral Videos) पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ खळखळून हसवणारे, काही इमोशनल करणारे तर काही अंगावर काटा आणणारे (Shocking Videos) असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजेल, की जर आपल्यात हिंमत असेल तर अगदी मोठं संकटही टाळता येतं. रडता-रडताच नवरीनं केलं असं काही की नवरदेवही अवाक, VIDEO पाहून पडाल प्रेमात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, की साप अगदी सहजपणे कोणत्याही पक्षाला आपलं शिकार बनवतो. याच कारणामुळे बहुतेक पक्षी सापापासून दूर राहणंत पसंत करतात. मात्र, पक्षांची शिकार करताना प्रत्येकच वेळी सापाला यश मिळेलच असं नाही. अनेकदा सापालाही मोकळ्या हातानंच परतावं लागतं. असाच एक व्हिडिओ (Snake Video) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका डोंगरावर असलेल्या बिळात एक पक्षी शिरण्याचा प्रयत्न करत असतो, इतक्यात एक साप या पक्षावर हल्ला करतो. साप पक्ष्याला दाबण्याचा प्रयत्न करतो. मात्र, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हा पक्षीदेखील पूर्ण प्रयत्न करतो आणि अखेर सापाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत तो पक्षी तिथून निघून जातो. मैदान सोडून अचानक प्रेक्षकांकडे धावत आला बैल; VIDEO मध्ये पाहा पुढे काय घडलं हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. याच कारणामुळे अनेक यूजर्सनी व्हिडिओवर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं म्हटलं, की स्वतःवर विश्वास असेल तर आपण अगदी मोठी संकटंही परतवून लावू शकतो. याशिवाय इतरही अनेकांनी पक्षाच्या हिमतीचं कौतुक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या