JOIN US
मराठी बातम्या / Viral / अचानक विमानात झाली भल्यामोठ्या सापाची एन्ट्री अन्..; अंगावर काटा आणणारा VIDEO VIRAL

अचानक विमानात झाली भल्यामोठ्या सापाची एन्ट्री अन्..; अंगावर काटा आणणारा VIDEO VIRAL

फ्लाईटच्या (Flight) आत साप (Snake) आल्याची कल्पना करूनही थरकाप उडतो, मात्र अशीच घटना घडली कोलकातामध्ये. यात इंडिगो एअरलाइन्सची फ्लाईट कोलकाताहून मुंबईला येत होती

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकाता 08 ऑगस्ट : विचार करा की तुम्ही फ्लाईट पकडण्यासाठी विमानतळावर (Airport) गेला आहात आणि अचानक तुमच्यासमोर साप (Snake in Flight) आला तर? सहाजिकच विमानतळावर साप फिरताना पाहून कोणालाही भीती वाटेल. मात्र, अशीच एक घटना घडली आहे कोलकातामध्ये (Kolkata). यात रनवेवर फिरणाऱ्या सापाचा व्हिडिओ (Snake Video) सध्या व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे. या घटनेनंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला. अरे बापरे! कुणाच्या हातात कुणाच्या गळ्यात, सापांना घेऊन रस्त्यात फिरतायेत लोक फ्लाईटच्या आत साप आल्याची कल्पना करूनही थरकाप उडतो, मात्र अशीच घटना घडली कोलकातामध्ये. यात इंडिगो एअरलाइन्सची फ्लाईट कोलकाताहून मुंबईला येत होती. इतक्यात फ्लाईटमध्ये साप असल्याचं आढळून आलं. जेव्हा स्टाफनं पाहिलं की फ्लाईटच्या आतमध्ये साप आहे, तेव्हा सर्वांचाच थरकाप उडाला. ही फ्लाईट कोलकाताहून मुंबईला निघाली होती. मात्र आपलं सामान ठेवण्यासाठी प्रवासी कर्मचाऱ्यांच्या कार्गोपर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांना दिसलं, की आतमध्ये एक मोठा साप बसलेला आहे. हा साप वेगात इकडे-तिकडे फिरत फ्लाईटमध्ये शिरला.

संबंधित बातम्या

…अन् स्टेजवर नवरीसमोरच लोळायला लागला नवरदेवाचा मित्र; Wedding Video Viral हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की साप रस्त्यावर वेगात चालत आहे आणि तो प्लेनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहे. या घटनेची माहिती एअरपोर्ट अथॉरिटीला दिली गेली. यानंतर वनविभागाला याबाबत सांगण्यात आलं. वनविभागाच्या टीमनं सापाला रेस्क्यू करून आपल्यासोबत नेलं. यानंतर प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी वेगळ्या विमानाची व्यवस्था केली गेली. सोशल मीडियावर एका यूजरनं या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या