JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : चालत्या ट्रेनमध्ये तरुणीचा जीवघेणा स्टंट, बाहेर डोकं काढलं आणि....

Viral Video : चालत्या ट्रेनमध्ये तरुणीचा जीवघेणा स्टंट, बाहेर डोकं काढलं आणि....

आजकाल सोशल मीडियाचा प्रभावर सर्वांवरच पडला आहे. दिवसेंदिवस याची क्रेझ वाढत चालल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक लोक निरनिराळ्या गोष्टी करताना दिसून येतात.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 जून : आजकाल सोशल मीडियाचा प्रभावर सर्वांवरच पडला आहे. दिवसेंदिवस याची क्रेझ वाढत चालल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक लोक निरनिराळ्या गोष्टी करताना दिसून येतात. यामध्ये मजेशीर व्हिडीओ, विचित्र गोष्टी, भितीदायक कृत्य, खतरनाक स्टंट असं काही ना काही करताना दिसतात. मात्र कधी कधी प्रसिद्धीसाठी केलेले स्टंट त्यांच्यावरच उलटतात. असंच काहीसं सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. सोशल मीडियासाठी व्हिडीओ बनवताना एक मुलगी ट्रेनच्या बाहेर हात काढून शरीर झुकवून आनंद घेताना दिसत आहे. मात्र हे भयानक कृत्य तिच्याच अंगलट येतं आणि पुढच्याच क्षणी तिच्यासोबत जे घडतं ते पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तरुणीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगी ट्रेनच्या गेटचे हँडल धरून हवेत डोलत आहे. तर दुसऱ्या गेटवर उभा असलेला व्यक्ती तिचा व्हिडिओ बनवत आहे. मुलीने तिचे संपूर्ण शरीर हवेत झोकून दिले आहे आणि ती मस्त आनंदात दिसत आहे. तेवढ्यात तरुणी समोर बघते आणि तिला खांब दिसतो. अवघ्या एक सेकंदापूर्वी तरुणी स्वत:ला धडकेपासून वाचवते. मुलीने योग्य वेळी स्वत:ला पुढे केलं नसते तर तिचं डोकं खांबाला आदळलं असतं. जरी तिनं योग्य वेळी स्वतःला मोठ्या धोक्यापासून वाचवलं असलं तरी हे खूपच भयानक होतं. एका सेकंदावरुन तिला मोठी दिखापत झाली असते किंवा जीवदेखील गमवावा लागला असता.

संबंधित बातम्या

@NoContextHumans नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 12 सेकंदांचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरली असेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला असून व्हिडीओवर भरपूर कमेंटही पहायला मिळत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या