प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 13 जुलै : काही घटना अशा घडतात की ज्या सुरुवातीला आपल्याला अगदी सामान्य वाटतात. परंतू त्याचे परिणाम मात्र फार विचित्र किंवा धक्कादायक असतात. असाच काहीसा प्रकार एका मुलासोबत घडला. त्या मुलाच्या डोळ्यात खाज आणि वेदना होत होत्या, त्यानंतर तो डॉक्टरकडे गेला. तेव्हा डॉक्टरांनी त्याच्या डोळ्यांची तपासणी केली असता त्याच्या पापण्यात किळसवाणे किडे भरलेले आढळले. ही घटना तुर्किए येथील ताटवान शहरातील आहे. 10 वर्षाच्या चिमुकल्यासोबत घडलेली ही घटना वैद्यकीय शास्त्रासाठीही विचित्र घटना होती. याआधीही अशा घटना समोर आल्या असल्या तरी शहरात राहणाऱ्या एका चिमुकलीच्या बाबतीत मात्र यावेळी वेगळेच घडले. साधारणपणे शेतात काम करणाऱ्या लोकांची किंवा नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांची ही तक्रार असते, पण ही केस तर शहरात राहणाऱ्या लोकांसाठी होती. मुलाच्या डोळ्यात वेदना आणि खाज वाढली, म्हणून 5 जुलै रोजी त्याचे पालक त्याला ताटवन स्टेट हॉस्पिटल आय पॉलीक्लिनिकमध्ये घेऊन गेले. न्यूजवीकच्या वृत्तानुसार, डॉ. हलील इब्राहिम अतेसोउलू यांनी या प्रकरणाचा अभ्यास केला आणि सांगितले की मुलाच्या डोळ्यांची तपासणी करताना त्यांना काहीतरी हलत असल्याचे दिसले. तो त्या मुलाच्या पापण्यांच्या आत होता. अशा स्थितीत त्यांनी सूक्ष्म तपासणीद्वारे ते स्वच्छ केले. डॉक्टरांचे म्हणणे आहे की ती माशी त्याच्या डोळ्यांतून गेली होती, परंतू तिने तिच्या अळ्या त्याच्या पापण्यांमध्ये सोडल्या होत्या आणि त्यांनी पापण्यात आपलं घर केलं होतं. त्याची साफसफाई करणे हे खूप अवघड आणि बारकाईचे काम होते. परंतु डॉक्टरांनी ते केलं ज्यानंतर आता त्या मुल्याची समस्या कमी झाली आहे. यापूर्वीही अशी प्रकरणे समोर आली आहेत यापूर्वी फ्रान्समधील 53 वर्षीय व्यक्तीसोबत असा प्रकार घडला आहे. तो घोडा आणि मेंढ्यांच्या मळ्याजवळ काम करत होता, तेव्हा त्याच्या डोळ्यात बोटफ्लायची अळी गेली होती. येथेही डॉक्टरांनी त्याच्या उजव्या डोळ्यातील डझनभर अळ्या काढल्या होत्या. वैद्यकीय शास्त्रात याला ऑप्थाल्मोमायकोसिस म्हणतात. जेव्हा माशीच्या अळ्या माणसाच्या डोळ्यात अडकतात. यामुळे वेदना, जळजळ, खाज सुटणे, डोळ्यात काहीतरी गेल्याची भावना आणि सूज येते. त्यामुळे डोळ्यातील खाजेकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करु नका.