JOIN US
मराठी बातम्या / Viral / लज्जास्पद कृत्य! डस्टबीनमध्ये सापडलं सॅनिटरी पॅड, मॅनेजरनं महिला कर्मचाऱ्यांचे उतरवले कपडे

लज्जास्पद कृत्य! डस्टबीनमध्ये सापडलं सॅनिटरी पॅड, मॅनेजरनं महिला कर्मचाऱ्यांचे उतरवले कपडे

जगभरातून रोज नवनवीन घटना समोर येत असतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक, भावुक घटना समोर येत असतात. कधी आपण विचारही करु शकत नाही अशी धक्कादायक प्रकरणे समोर येतात.

जाहिरात

डस्टबीनमध्ये सापडलं सॅनिटरी पॅड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 जुलै : जगभरातून रोज नवनवीन घटना समोर येत असतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक, भावुक घटना समोर येत असतात. कधी आपण विचारही करु शकत नाही अशी धक्कादायक प्रकरणे समोर येतात. असंच काहीसं प्रकरण सध्या समोर आलं आहे ज्यामध्ये डस्टबिनमध्ये सॅनिटरी पॅड सापडलं म्हणून मॅनेजरनं लज्जास्पद कृत्य केलं. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. एका पनीर कारखान्यात महिलेनं चुकीच्या डस्टबिनमध्ये सॅनिटरी पॅड टाकले. यामुळे मॅनेजर संतापला आणि त्याने धक्कादायक कृत्य केलं. हे प्रकरण सध्या व्हायरल होत असून लोक संताप व्यक्त करत आहेत.

केनियामधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण केनियाच्या ब्राउन फूड कंपनीचं आहे. या ठिकाणी महिलेनं चुकीच्या डस्टबिनमध्ये सॅनिटरी पॅड टाकलं. यामुळे मॅनेजर खूप संतापला. मॅनेजरनं लाजिरवाणं कृत्य करत महिला कर्मचाऱ्यांना त्यांचं कपडे काढायला लावले. कारण त्याला कोणाची मासिक पाळी सुरू आहे हे तपासायचं होतं. हिमनदीतून वाहतोय रक्ताचा धबधबा? काय आहे रहस्य, शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा ब्राऊन्स फूड कंपनीनं महिला कर्मचाऱ्यांसोबत केलेल्या अशा लाजिरवाण्या कृत्याबद्दल मॅनेजरला नोकरीवरून काढून टाकलं आहे. लिमुरू येथील पोलिसांनी सांगितलं की, या घटनेबद्दल तीन जणांवर आरोप करण्यात आला आहे. सिनेटर ग्लोरिया ओरवोबा यांनी पीरियड शेमिंगच्या विरोधात ही पोस्ट शेअर केली होती. या घटनेबद्दल कंपनीनं खेद व्यक्त केला. त्यांनी म्हटलं, कंपनी कर्मचार्‍यांना संवेदनशील करण्यासाठी आणि संवाद सुधारण्यासाठी धोरणे बदलण्याचा विचार करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या