शास्त्रज्ज्ञांनी आणखी एक रहस्य उघड केलं आहे. ते म्हणजे अंटार्क्टिकामधील हिमनदीतून वाहणाऱ्या रक्ताच्या धबधब्याचं.
टेलर ग्लेशियर पूर्व अंटार्क्टिकामधील व्हिक्टोरियामध्ये रक्ताचा झरा वाहताना पाहून शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले.
शास्त्रज्ञांनी हिमनदीतून वाहणाऱ्या रक्तामागील कारण शोधून काढलं आहे. जाणून घेऊया शास्त्रज्ञांचं काय म्हणणं आहे?
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ केन लिव्ही यांनी सांगितलं की ते मायक्रोस्कोपची चित्र पाहून हैराण आहेत.
मायक्रोस्कोपमध्ये पाहून त्यांना आढळलं की, यामध्ये लहान नॅनोस्फियर होते आणि ते लोखंडाने म्हणजेच आयरनने भरलेले होते. हे लहान कण प्राचीन सूक्ष्मजंतूंमधून येतात आणि मानवी लाल रक्तपेशींच्या सारखे असतात.
हिमनदीतून येणारा धबधबा जेव्हा खाली येऊन ऑक्सिजन, सूर्यप्रकाश आणि उष्णता यांच्या संपर्कात येतो तेव्हा त्याचा रंग लाल होतो. आणि त्यामध्ये असलेल्या खनिजांमुळे त्याचा रंग बदलतो.