JOIN US
मराठी बातम्या / Viral / भैया, चलो चलो हो गया...वाघाला बघताच पर्यटकांची हवा झाली टाईट, Video पाहून आवरणार नाही हसू

भैया, चलो चलो हो गया...वाघाला बघताच पर्यटकांची हवा झाली टाईट, Video पाहून आवरणार नाही हसू

जगभरातील अनेक लोकांना प्राण्यांविषयी आकर्षण असतं. त्यांना जवळून पाहण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी लोक जंगल सफारीवर, पार्कमध्ये जातात.

जाहिरात

वाघाला बघताच पर्यटकांची हवा झाली टाईट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 जुलै : जगभरातील अनेक लोकांना प्राण्यांविषयी आकर्षण असतं. त्यांना जवळून पाहण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी लोक जंगल सफारीवर, पार्कमध्ये जातात. याठिकाणी अगदी जवळून प्राण्यांना पाहता येतं तर काहींना प्राण्यांना हात लावण्याचीही संधी मिळते. मात्र कधी कधी हे महागातही पडतं. जंगल सफारीदरम्यान अनेकांना चांगले तर काहींना वाईट अनुभवही येत असतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये पर्यटकांची वाघाला पाहून हवा टाईट झाली. काही लोक जंगल सफारीसाठी गेले होते. मात्र जंगल सफारीवेळी अचानक वाघ डरकाळी फोडत त्यांच्या वाहनाकडे चाल करत होता.हे पाहून त्यांची ओरडा निघाला. हा व्हिडीओ पाहून पर्यटकांची हवा टाईट झाली असली तरी हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना मात्र हसू अनावर होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पर्यटक गाडीतून मस्त जंगल सफारीचा आनंद लुटत आहेत. तेवढ्यात जंगलातून वाघ बाहेर येतो आणि डरकाळी फोडत पर्यटकांकडे वाटचाल करतो. गाडी बसलेली तरुणी मोठ्याने आरडायला लागते. भैया चलो होगया, भैया चलो अशी ओरडते. तर गाडी चालवणारा चालक वाघाला पळवून लावण्यासाठी हाड-हाड ओरडाताना ऐकू येत आहे. एकंदरीत वाघाला पाहून पर्यटकांची हवा टाईट झालीय. त्यांचा आरडाओरडा ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

संबंधित बातम्या

@DoctorAjayita नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 30 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. अनेक लोक व्हिडीओला लाईक्स आणि कमेंट करत आहेत. दरम्यान, जंगलातील असे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर समोर येत असतात. यापूर्वीही जंगलातील प्राण्यांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या