मॉस्को 18 ऑगस्ट : रशियामध्ये एका लष्कराच्या मालवाहक विमानासोबत (Military Transport Aircraft) मोठी दुर्घटना घडली आहे. हे विमान मॉस्कोजवळ क्रॅश झालं (Russia Plane Crash) आहे. या घटनेनंतर काही सेकंदातच विमान आगीच्या गोळ्यात बदललं. हे विमान क्रॅश होताच परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. या भयंकर घटनेचा व्हिडिओ समोर आला (Plane Crash Video) आहे. यात विमान हवेत असतानाच आग लागल्याचं पाहायला मिळतं. OMG! कुत्र्यासाठी थेट भुकेल्या अॅनाकोंडाशी भिडला तरुण; थरारक VIDEO VIRAL रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, Ilyushin Il-112V हे लष्करी वाहतूक विमान तीन लोकांसह मंगळवारी मॉस्को क्षेत्रात चाचणी उड्डाणादरम्यान कोसळले. या अपघातात कोणती जीवितहानी झाली की नाही हे कंपनीच्या निवेदनातून स्पष्ट झाले नाही. मात्र, आरआयए वृत्तसंस्थेने एका अज्ञात सूत्राचा हवाला देत सांगितलं की, क्रूचा मृत्यू झाला आहे.
…आणि मगरीने तिला जबड्यात धरून पाण्यातच खेचलं; VIDEO पाहून अंंगावर येईल काटा दुर्घटनेच्या एका व्हिडिओमध्ये विमान कमी उंचीवर उडताना दिसत आहे. याच्या एका पंखाला आग लागलेली आहे. काही वेळातच हे विमान जमिनीवर कोसळतं. हा भयंकर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. रशियाच्या विमानासोबच याआधीदेखील तुर्कीमध्ये एक दुर्घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, लँडिगच्या दरम्यान या विमानासोबत ही दुर्घटना घडली होती. या विमानामध्ये रशियाचे पाच तर तुर्कीचे तीन नागरिक होते.