नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : जंगल सफारी करणाऱ्या लोकांवर सहसा प्राणी हल्ला करत नाहीत. पण शिस्तीत राहिल्यास. मात्र मोबाईल किंवा कॅमेरा हातात घेऊन प्राण्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न महागात पडू शकतो. जेव्हापासून सेल्फी, रील सोशल मीडियावर पोस्ट करण्याची क्रेज वाढली आहे, तेव्हापासून काहीतरी वेगळं करण्यासाठी लोक प्राण्यांच्या खूप जवळ येतात. यामुळे त्यांची प्रायव्हसी संपुष्टात येत आहे. म्हणूनच प्राण्यांना खूप लवकर राग येतो. त्यामुळे जर तुम्हाला जंगल सफारीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला जंगलाचे नियम पाळावे लागतील. जर तुम्ही नियम मोडले तर तुमच्या बाबतीतही तेच होईल जे आता आपण पाहणार आहोत. IFS सुशांत नंदा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की जंगल सफारीदरम्यान लोक प्राण्यांच्या इतके जवळ गेले की प्राणी भडकले. तरुणीला पोझ सांगण्याच्या नादात फोटोग्राफरसोबत घडलं विचित्र, Video पाहून व्हाल लोटपोट हा व्हिडिओ बंगालमधील एका उद्यानाचा आहे. पर्यटक आपल्या कॅमेऱ्याने प्राण्यांचे फोटो काढत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे, तेव्हाच तेथे उपस्थित असलेल्या दोन गेंड्यांना राग येतो. ते धावू लागतात. चालकाला गाडी वळवण्यासाठी रस्त्यावर पुरेशी जागा नव्हती. अशात ती तशीच गाडी मागे घेण्याचा प्रयत्न करू लागतो. मात्र गेंड्यांचा वेग इतका जास्त असतो, की चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटतं आणि गाडी शेजारीच असलेल्या खड्ड्यात पलटी होते. यात सहा पर्यटक जखमी झाले.
व्हिडिओ शेअर करताना सुशांत नंदा यांनी लिहिलं की, ‘वन्यजीव सफारीमध्ये काय करणं चूक आहे हे यातून दिसून येतं. वन्य प्राण्यांच्या प्रायव्हसीचा आदर करा. स्वत:च्या सुरक्षेचा विचार आधी करा. अपघातात जखमी झालेले सर्व पर्यटक सुखरूप असल्याचं सांगण्यात आलं आहे, मात्र प्रत्येक वेळी तुम्ही भाग्यवान असालच असं नाही. म्हणूनच त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करा’. जंगल सफारीचे काही नियम आणि कायदे आहेत. प्रत्येक वेळी प्राण्यांपासून ठराविक अंतर दूर चालायला सांगितलं जातं. कॅमेरा फ्लॅश लावू नये, असंही सांगितलं जातं. कारण त्यामुळे अनेकवेळा दुर्घटनाही झाल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं जीवन सुरक्षित ठेवायचं असेल तर हे नियम आणि कायदे पाळावे लागतील या व्हिडिओला आतापर्यंत 83 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एक हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला असून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, सफारी ऑपरेटरने नियमांचं काटेकोरपणे पालन करावं. पर्यटकांनीही जंगलाचे नियम पाळावेत. आणखी एका युजरने लिहिलं की, नशीबाने हा गेंडा होता, वाघ नाही. गेंडा गाडीवर हल्ला करून परत जातो, पण वाघ आत घुसून नुकसान पोहोचवू शकतो.. तर पर्यटकांचं म्हणणं आहे, की दोन्ही गेंडे झाडांमध्ये लढाई करत होते आणि पर्यटकांना पाहताच त्यांनी हल्ला केला.