JOIN US
मराठी बातम्या / Viral / काय सांगता! सिगारेटचा असा फायदा, इतका जबरदस्त वापर की तु्म्ही विचारही केला नसेल

काय सांगता! सिगारेटचा असा फायदा, इतका जबरदस्त वापर की तु्म्ही विचारही केला नसेल

तामिळनाडूतल्या कोईमतूरमधील एक स्वयंसेवी संस्था सिगारेटचा हा अनोखा वापर करत आहे.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ए जेराल्ड/चेन्नई, 06 जून : मानवी वापरातल्या अनेक गोष्टी पर्यावरणाला घातक असतात. सिगारेट म्हणजे त्यापैकीच एक. दर वर्षी जगभरात 4.5 ट्रिलियन एवढ्या प्रचंड संख्येने सिगारेटची थोटकं जमा होतात. ही थोटकं पूर्णपणे विघटनशील नसतात. त्यात प्लास्टिक व इतरही काही घातक घटक असतात. सिगारेटच्या कचऱ्याचं मातीत पूर्णपणे विघटन होण्यासाठी 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागतो. कचऱ्याचा पुनर्वापर करता यावा, या दृष्टीने अनेक संस्था प्रयत्न करत आहेत. आता सिगारेटच्या कचऱ्याचा वापर करून छानशी सॉफ्ट टॉइज तयार करण्याचं काम तमिळनाडूतल्या कोईमतूरमधली एक स्वयंसेवी संस्था करत आहे. सिगारेटच्या थोटकांमध्ये प्लास्टिक असतंच. शिवाय फॉरमॅल्डिहाइड, निकोटीन आणि इतर अनेक रसायनंही असतात. त्यापैकी सेल्युलोज अ‍ॅसिटेट या घटकामुळे माती प्रदूषित होते. मातीत पाणी शोषून घेण्यासाठी अडसर होतो. त्यामुळे अशा पर्यावरणाला घातक असलेल्या सिगारेटच्या थोटकांचा पुनर्वापर करण्याचं काम कोईमतूरमधली एक सामाजिक संस्था करते आहे. संस्थेने यासाठी टीम तयार करून त्यांच्यात काम विभागलं आहे. सिगारेट्स जमा होणाऱ्या शहरातल्या जागा शोधून थोटकं संस्थेमार्फत गोळा केली जातात. त्याशिवाय कचऱ्यातला स्पंजदेखील गोळा केला जातो. काही जण खेळण्यांमध्ये व उशांमध्ये तो स्पंज भरतात. सिगारेट्समधला निकोटीन हा घटक जवळपासच्या शेतांमध्ये कंपोस्टसाठी पाठवला जातो. सिगारेटचा वरचा कागद बारीक केला जातो व त्यापासून डासांना प्रतिबंध करणारं औषध बनवलं जातं. एका वर्षात ओढायचा 6 लाख सिगारेट; 20 वर्षांनी सवय सोडताच दिसला हा मोठा परिणाम “सिगारेट्स गोळा करण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये कचऱ्याचे 15 ते 20 डबे ठेवण्याचा आमचा मानस आहे. नजीकच्या काळात अशा प्रकारे कोईमतूरमधल्या 100 वॉर्ड्समध्ये सिगारेट्स गोळा करण्यासाठी कचऱ्याचे डबे असतील. सिगारेट ओढायची की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे; पण सिगारेटच्या कचऱ्याचं विघटन हा जगासमोरचा गंभीर प्रश्न आहे. पर्यावरणासाठी काही तरी करावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे सिगारेट्सच्या कचऱ्याबाबत मी जनजागृती करत आहे. या कचऱ्यापासून तयार झालेल्या उशा सरकारी रुग्णालयांना आम्ही मोफत देतो,” असं संस्थेचे अध्यक्ष हाफिसूर रेहमान सांगतात. 1900मध्ये जेव्हा सिगारेट्स लोकप्रिय झाल्या, तेव्हा त्यांच्यामध्ये फिल्टर्स नव्हते. 1950मध्ये एका सिगारेट कंपनीला फिल्टर्स लावण्याची कल्पना सुचली. सिगारेट्समध्ये फिल्टर्स नसतील, तर फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो, असा निष्कर्ष तेव्हाच्या संशोधकांनी मांडला होता. यामुळे सगळ्या सिगारेट्स कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांमध्ये प्लास्टिक फिल्टर्स बसवले. सध्या 98 टक्के सिगारेट्समध्ये फिल्टर्स आहेत; मात्र हे फिल्टर्स काही विषारी द्रव्यं रोखतात आणि सिगारेट ओढायला सोपी बनवतात. Cigarette smoking चा भयंकर Video; पाहिल्यानंतर सिगारेट ओढणं सोडा साधं नावही काढणार नाहीत कॅनडातली एक कंपनी नैसर्गिकरीत्या विघटनशील सिगारेट्स तयार करते. या ग्रीन सिगारेट्सचं थोड्याच दिवसांत मातीत विघटन होतं. समुद्रकिनाऱ्यांवर फेकून दिलेली सिगारेटची थोटकं गोळा करण्यासाठी रोबोट्स तयार करण्यात आले आहेत. देशाच्या काही भागांमध्ये कावळ्यांना सिगारेट्स गोळा करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलंय. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या सिगारेटचा पुनर्वापर शक्य असल्याचं कोईमतूरच्या एनजीओने दाखवून दिलं आहे. सिगारेट्सचा कचरा हा भविष्यातला गंभीर प्रश्न होणार आहे. त्यामुळे सिगारेट ओढणारे आणि ती तयार करणारे यांच्यावरची जबाबदारी मोठी असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या