JOIN US
मराठी बातम्या / Viral / सापासारखं दिसणारं मांजर; पण या Viral Photo चं सत्य मात्र वेगळंच, तज्ज्ञांचा खुलासा

सापासारखं दिसणारं मांजर; पण या Viral Photo चं सत्य मात्र वेगळंच, तज्ज्ञांचा खुलासा

सोशल मीडियावरचा मांजराचा हा फोटो पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. कारण पाहिल्याप्रथम पाहिल्यावर ते खरोखरच सापासारखं दिसतं आणि त्याच्या शरीरावरचे स्पॉट्सदेखील सापासारखे आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 18 मार्च : जगात विविध प्रकारचे प्राणी आहेत. मोजायला गेलो, तरी ते सहजासहजी शक्य होणार नाही. पृथ्वीवर असणाऱ्या बहुतेकशा सजीवांवर शास्त्रज्ञ संशोधन करीत असले, तरी असे अनेक प्राणी आहेत, ज्यांच्याबद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे. सध्या अशाच एका प्राण्याचा फोटो वेगानं व्हायरल होतोय. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की, फोटोमध्ये दिसणारा प्राणी म्हणजे मांजराची अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहे, जी सापासारखी दिसते. निऑन येलो आणि ब्लॅक स्पॉट्स असलेल्या मांजराच्या फोटोची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा सुरू आहे. या मांजराचं नाव ‘अ‍ॅमेझॉन स्नेक कॅट’ असं सांगितलं जातंय. त्या मांजराचं शास्त्रीय नाव ‘सर्पन्स कॅटस’ असं आहे. या मांजराचं बाह्य रूप सापाच्या प्रजातीशी मिळतंजुळतं असून, ते दिसायला सापासारखंच असल्याचा दावा केला जातोय. आता नवा अजब ट्रेंड; Coca-Cola ने केस धुतायेत लोक, काय आहे कारण? @Kamara2R या ट्विटर अकाउंटवरून या मांजराचा फोटो शेअर करण्यात आला असून त्यावर वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘सर्पन्स कॅटस ही पृथ्वीवरची मांजराची दुर्मीळ प्रजात आहे. हे प्राणी अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्टच्या अंतर्गत भागात राहतात. त्यामुळे त्यांच्यावर संशोधन कमी झालं आहे. अशा प्रकारच्या मांजराचा पहिला फोटो 2020 मध्ये घेण्यात आला होता. या मांजराचं वजन 25 किलोपर्यंत असतं.’

संबंधित बातम्या

सत्य नेमकं काय? सोशल मीडियावरचा मांजराचा हा फोटो पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. कारण पहिल्याप्रथम पाहिल्यावर ते खरोखरच सापासारखं दिसतं आणि त्याच्या शरीरावरचे स्पॉट्सदेखील सापासारखे आहेत; पण इंटरनेटवर जे काही दिसतं, ते योग्य असतंच असं नाही. ‘न्यूयॉर्क पोस्ट’ आणि ‘न्यूज डॉट कॉम डॉय एयू’ या वेबसाइटच्या माहितीनुसार, या फोटोची सत्यता तपासण्यासाठी तो प्राणितज्ज्ञांना पाठवण्यात आला होता. फोटोचं निरीक्षण केल्यानंतर प्राणितज्ज्ञांनी सांगितलं की, मांजराचा रंग ‘गोल्ड रिंग्ड कॅट स्नेक’सारखा आहे. परंतु असं मांजर अस्तित्वात असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळाला नसल्यामुळे ते ‘अ‍ॅमेझॉन स्नेक कॅट’ आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. असं मांजर पाहिल्याचा दावा कोणीही केलेला नाही; मात्र ज्या सापासारखं हे मांजर दिसत असल्याचं म्हटलं जात आहे, ते साप त्याच भागात आढळतात, जिथे या मांजराचं अस्तित्व असल्याचा दावा केला जातोय.

ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या या फोटोवर, ‘हा फोटो फेक आहे’, ‘तो फोटोशॉपमध्ये बनवला आहे’, अशा कमेंट अनेक युझर्स करत आहेत. या फोटोने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या