JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : कॉलेज कॅंटीनच्या जेवणात आढळलं उंदराचं डोकं, Video व्हायरल होताच उडाली खळबळ

Viral Video : कॉलेज कॅंटीनच्या जेवणात आढळलं उंदराचं डोकं, Video व्हायरल होताच उडाली खळबळ

जेवणामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी सापडतात. आत्तापर्यंत अनेक विचित्र घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये लोकांच्या खाण्यामध्ये कधी जीव तर कधी वस्तू आढळल्या आहेत.

जाहिरात

विद्यार्थ्याच्या जेवनात विचित्र गोष्ट सापडली

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 जून : जेवणामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी सापडतात. आत्तापर्यंत अनेक विचित्र घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये लोकांच्या खाण्यामध्ये कधी जीव तर कधी वस्तू आढळल्या आहेत. अनेक विचित्र, किळसवाण्या, धक्कादायक घटना सोशल मीडियावर समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आलीये ज्यामध्ये एका कॉलेज कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्याच्या जेवनात काहीतरी भलतीच वस्तू आढळली. हे प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आलं असून लोक संताप व्यक्त करत आहेत. विद्यार्थ्याच्या जेवणात विचित्र गोष्ट सापडली ज्यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे. याचा व्हिडीओदेखील विद्यार्थ्याने शेअर केलाय. सीएएनने याविषयी वृत्त दिलं असून हे समोर आलेलं प्रकरण चीनमधील जिआंगसी प्रांतातील आहे.

इंडस्ट्रियल व्होकेशन आणि टेक्निकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या कॅन्टिनमधील जेवणात विद्यार्थ्यांना उंदराचे डोके आढळले. विद्यार्थ्याने याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर प्रकरण पेटलं. त्यामुळे महाविद्यालयाला याविषयी स्पष्टीकरण द्यावं लागलं. लोक भूक भागवण्यासाठी खातात मातीच्या रोट्या, कारण वाचून बसेल धक्का? महाविद्यालयाने याविषयी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, ते उंदराचं डोकं नसून डक नेक आहे. हा पदार्थ चीनमध्ये खूप आवडीने खाल्ला जातो. कॉलेजच्या या वक्तव्यानं हे प्रकरण काही प्रमाणात शांत झालं. मात्र सोशल मीडियावर हे प्रकरण चर्चेत आल्यानं नेटकरी चांगलेच भडकले. मुळे अन्न निरीक्षक आणि इतर स्थानिक अधिकाऱ्यांना कॅन्टीनमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले.

फूड इन्स्पेक्शन केल्यावर हे समोर आलं की विद्यार्थ्याच्या जेवनात उंदराचं डोकच होतं. कॉलेजने दिलेलं स्पष्टीकरण खोटं ठरलं. त्यानंतर सरकारने कॅन्टिनचा परवाना रद्द केला आणि त्यांना दंडही ठोठावण्यात आला. कॉलेज व्यवस्थापनालाही ताकिद देण्यात आली. या प्रकरणामुळे चीनमध्ये अन्न सुरक्षा हील चिंतेची बाब बनली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या