व्हिडीओ व्हायरल
मुंबई : साप म्हटलं की लोक चार पाऊलं लांबच पळतात. कारण त्याच्या एक दंश माणसाचा खेळ खल्लास करु शकतं. सापासारखाच अजगर देखील फार धोकादायक आहे. कारण अजगर पाहता पाहाता कोणालाही जिवंत गिळू शकतं. त्याची पकड इतकी घट्ट असते की त्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकणार नाही. अजगराचा असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून नेटकरीही शॉक झाले आहेत.
या व्हिडीओमध्ये अजगराने एका मोठ्या गायीला जिवंतच गिळलं आहे. हा व्हिडीओ तुम्ही पाहू शकत असाल तरच पाहा. कारण तो धडकी भरवणारा आहे. हा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. अजगराने संपूर्ण गाय गिळली. Video : स्कूटीच्या हँडलमधून येत होता आवाज, चालकाने नीट पाहिलं तेव्हा बसला धक्का तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, अजगर प्रचंड मोठा असून त्याने गायीला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतले आहे. तो अजगर गायीला पूर्णपणे गुंडाळून बसला. अजगराने संधी साधून गायीवर हल्ला केल्याचे दिसत आहे. या अजगराने एवढ्या मोठ्या प्राण्याला सहज गिळला, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मग त्याच्यासमोर माणसाला गिळणं किती सोपं असावं. व्हिडीओसाठी इकडे क्लिक करा साप त्यांच्या भक्ष्याला विषाने मारतात आणि अजगर त्यांच्या स्नायूंच्या ताकदीचा वापर करून त्यांच्या शिकारीभोवती गुंडाळतात आणि मग त्यांना गिळतात. काही काळाने एखाद्या वस्तूला किंवा झाडाला विळखा घालून मग खाल्लेली गोष्ट पचवतात.