JOIN US
मराठी बातम्या / Viral / Shocking Video: धावत्या कारच्या छतावर Push-Ups आणि जीवघेणा स्टंट, तरुणासोबत काय घडलं पाहा

Shocking Video: धावत्या कारच्या छतावर Push-Ups आणि जीवघेणा स्टंट, तरुणासोबत काय घडलं पाहा

चालत्या कारच्या छतावर चार जण मद्यपान करताना, नाचताना आणि पुश-अप करताना दिसल्यानंतर एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

जाहिरात

धावत्या कारच्या छतावर Push-Ups

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 31 मे : एनसीआरमध्ये रोज काही ना काही विचित्र घटना पाहायला मिळत आहेत. कुणी रस्त्यावर स्टंटबाजी करताना दिसतं, तर कुणी जीवाची पर्वा न करता भरधाव वेगाने गाडी चालवताना दिसतं. अशीच आणखी एक घटना गुरुग्राममधून समोर आली आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती चालत्या गाडीवर पुश-अप करताना दिसला. गुरुग्राममध्ये चालत्या कारच्या छतावर चार जण मद्यपान करताना, नाचताना आणि पुश-अप करताना दिसल्यानंतर एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेचे दोन व्हिडिओ ऑनलाइन समोर आले होते, त्यानंतर शहर पोलिसांनी कारच्या मालकाला 6,500 रुपयांचा दंड ठोठावला, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती धावत्या अल्टो कारच्या वर चढला आणि पुश-अप करायला लागला. त्याचवेळी कारमध्ये बसलेले इतर मित्र कारच्या खिडकीतून बाहेर येतात आणि त्याला आणखी पुश-अप करण्यास सांगू लागताततो पुश-अप करण्यासाठी गाडीच्या छतावर बसतो, तर बाकीचे मित्र खिडकीतून ओरडत असतात. मागून येणा-या एका प्रवाशाने व्हिडिओ बनवला आणि नंतर तो ट्विटरवर शेअर केला. धावत्या मेट्रोचा दरवाजा उघडून घेतली उडी; व्यक्तीसोबत पुढे काय झालं तुम्हीच बघा, Video प्रदीप दुबे नावाच्या युजरने ट्विटरवर एक व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिलं की, “त्याला ना कोणाचा जीव जाण्याची भीती आहे ना गुडगाव ट्रॅफिक पोलिसांची.” यासोबतच त्यांनी वाहनाचा नंबरही शेअर केला. शहर वाहतूक पोलिसांनी सांगितलं की, “उल्लंघन करणार्‍याविरुद्ध 6,500 रुपयांचं चलन जारी करण्यात आलं आहे. आम्ही सर्व वाहनचालकांना विनंती करतो की त्यांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन करून त्यांचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये.”

संबंधित बातम्या

पोलिसांनी सांगितलं की त्यांनी या घटनेत वापरलेली कार जप्त केली आहे. लोकेश नावाच्या आरोपीलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस उपायुक्त (वाहतूक) वीरेंद्र म्हणाले, “रस्त्यावर अशी कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत.” या प्रकरणी डीएलएफ फेज-3 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या