अंजली शर्मा/लखनऊ, 26 मार्च : उत्तर प्रदेशच्या कन्नौज जिल्ह्याचं नाव येताच लोकांच्या मनात राजा जयचंद यांचं नाव येतं आणि राजा जयचंद यांचं नाव येताच, लोक विश्वासघातकी शब्द वापरण्यास सुरुवात करतात. मात्र कन्नौजच्या रहिवाशांसाठी हा शब्द शापासारखा बनला आहे. कन्नौजच्या कन्याकुब्ज नावाच्या समितीने आता आव्हान दिलं आहे. जर कोणी कन्नौजचा राजा जयचंद हे विश्वासघातकी असल्याचं सिद्ध केले, तर त्याला 5 लाखांचं बक्षीस दिलं जाईल.
राजा जयचंद हे उत्तर भारताचे राजे होता. ज्यांची गंगा नदीच्या काठी वसलेली क्षेत्रे होती. जयचंद यांचा जन्म इसवी सन 1170 च्या सुमारास झाला. राजा जयचंद यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं होती. मुलाचं नाव हरिश्चंद्र आणि मुलीचे नाव संयोगिता होतं.
त्या काळातील महान सम्राट पृथ्वीराज चौहान राजा जयचंद यांची सुंदर कन्या संयोगितावर मोहित झाले होते. पृथ्वीराज चौहान यांना संयोगिताशी लग्न करायचं होतं, पण राजा जयचंद यांना पृथ्वीराज चौहान आवडत नव्हते. पण पृथ्वीराज चौहान यांनी संयोगिताचं अपहरण केलं, तिला पळवून नेलं. त्यानंतर राजा जयचंद पृथ्वीराज चौहान यांना आपला सर्वात मोठा शत्रू मानू लागले. या शत्रुत्वाचा बदला घेण्यासाठी राजा जयचंद यांनी मोहम्मद घोरीशी मैत्री केली होती. जयचंद यांच्याशी मैत्रीनंतर मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान यांच्यावर हल्ला केला. ज्यामध्ये मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान यांचा पराभव करून त्यांना कैद केलं. यानंतर मुस्लिम साम्राज्य देशभर पसरलं. या अंतर्गत पृथ्वीराज रासो नावाच्या पुस्तकात राजा जयचंद यांना हिंदूंचे समर्थन न केल्याबद्दल विश्वासघातकी म्हटलं आहे.
जगातलं असं गाव जिथे रस्तेच नाहीत, कार-बाइक्सऐवजी बोटीने प्रवास करतात लोक
आजही कन्नौजमध्ये राजा जयचंद यांचा एक किल्ला आहे.. जिथं राजा जयचंद यांचा पुतळा बसवला आहे. दरवर्षी शिवरात्रीच्या दिवशी इथं राजा जयचंद यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम होतो. जिथे इतिहास अभ्यासक आणि दूरदूरचे जाणकार लोक येतात आणि सहभागी होतात. तज्ज्ञ आणि इतिहासकारांनी इतिहासाच्या पानांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. राजा जयचंद यांना चुकीच्या पद्धतीने विश्वासघातकी ठरवण्यात आल्याचं ते म्हणाले.. जर कोणी राजा जयचंदला तर्कानुसार विश्वासघातकी सिद्ध केलं तर कन्नौजची कन्याकुब्ज समिती त्यांना बक्षीस देईल, असं या समितीने म्हटलं आहे.
आलिशान कारमधून आले 2 चोर; सोनं-चांदी नव्हे तर पळवला पोपट कारण...
इतिहासकार सुशील राकेश यांनीही कन्नौजचा राजा जयचंद यांच्यावर एक महाकाव्य लिहिलं आहे. त्यांनी कन्नौजच्या राजाला एक महान योद्धा आणि हिंदू सम्राटातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असं वर्णन केलं आहे. त्यांनी सांगितले की, गंगेच्या काठावर वसलेल्या क्षेत्राचे राजा जयचंद यांनी वाराणसीत बनारस मंदिर बांधलं आणि अयोध्येतील राम मंदिरातही भूमिका बजावली. अशा अनेक गोष्टी इतिहासात नोंदवल्या जातात ज्याबद्दल असे म्हणता येईल की राजा जयचंद हिंदुत्वाचा वेगळा विचार करत होते आणि ते आपल्या समाजाप्रती दृढ निश्चय करणारे राजे होते. पृथ्वीराज रासो वगळता कोणत्याही इतिहासात राजा जयचंद यांना चुकीची पदवी देण्यात आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Local18, Uttar pradesh