JOIN US
मराठी बातम्या / Viral / viral video: बीचवर प्रपोज करताना झाली फजिती, सरप्राईज गेलं पाण्यात

viral video: बीचवर प्रपोज करताना झाली फजिती, सरप्राईज गेलं पाण्यात

कोण कधी कोणाच्या प्रेमात पडेल काही सांगता येत नाही. प्रत्येकजण प्रेमासाठी खूप काही करताना दिसून येतात. याच्या अनेक निरनिराळ्या घटनाही समोर येत असतात.

जाहिरात

बीचवर प्रपोज करणं व्यक्तीला पडलं महागात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 जून : कोण कधी कोणाच्या प्रेमात पडेल काही सांगता येत नाही. प्रत्येकजण प्रेमासाठी खूप काही करताना दिसून येतात. याच्या अनेक निरनिराळ्या घटनाही समोर येत असतात. लोक आपल्या प्रेयसीला किंवा प्रियकराला प्रपोज करण्यासाठी त्यांना खास वाटावं म्हणून अनेक नवनवीन, हटके गोष्टी करतात. त्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. मात्र कधी कधी त्यांचं हे सरप्राईज चुकीचं होतं आणि भलतंच घडतं. अशीच काहीशी घटना समोर आलीये ज्यामध्ये व्यक्ती प्रपोज करायला जातो आणि नको तेच घडतं. आजकाल लोकांची प्रपोज करण्याची पद्धतही बदलली आहे. आता लोक समुद्राच्या मध्यभागी आपल्या पार्टनरला प्रपोज करताना दिसतात. आजकाल असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या प्रेयसीला प्रपोज करतो मात्र यादरम्यान एक शॉकिंग घटना घडते. याचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक माणूस समुद्रकिनारी बांधलेल्या लाकडी पुलावर गुडघ्यावर बसून आपल्या जोडीदाराला प्रपोज करण्याचा प्रयत्न करतो आणि अंगठी काढतो, पण त्याच दरम्यान अचानक अंगठी त्याच्या हातातून सुटते आणि ती थेट पाण्यात पडते. लाकडी पूलवर असलेल्या बेचक्यांमधून अंगठी खाली पाण्यात जाते. यानंतर तो शॉक आणि अस्वस्थ होतो हे पाहण्यासारखे आहे.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये व्यक्ती गुडघ्यावर बसली आहे आणि त्याच्यासोबत एक लहान मूलगही आहे. समोर उभ्या असलेल्या आपल्या जोडीदाराला अंगठी दाखवून तो लग्नाचा प्रस्ताव ठेवतो, पण त्याच दरम्यान अंगठी अचानक पाण्यात पडते आणि त्याचा संपूर्ण प्लॅन क्षणार्धात उद्ध्वस्त होतो. @crazyclipsonly नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 15 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. व्हिडीओवर अनेक कमेंटही पहायला मिळतायेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या