फोटो : द सन
नवी दिल्ली 26 सप्टेंबर : विचार करा की एखादी महिला एका बाळाचा (Baby) विचार करून लेबर रूममध्ये (Labour Room) गेली दोन मुलं घेऊन बाहेर आलं तर तिची काय प्रतिक्रिया असेल? विस्कॉन्सिन येथील एका महिलेसोबतही असंही काहीसं घडलं. 30 वर्षीय लिंडसे अल्टिस हिनं एका मुलीला जन्म (Woman Gave Birth to Baby Girl) दिला आणि काहीच सेकंदात असं काही घडलं, जे पाहून ती आनंदाने ओरडू लागली. तिचा पतीही शॉक झाला. बापरे! चक्क डोळ्यांनी मेणबत्ती विझवते ही महिला; कारण वाचून येईल डोळ्यात पाणी लिंडसेनं सुरुवातीला एका मुलीला जन्म दिला तेव्हा तिला वाटलं की ही अतिशय लहान आहे. कारण याआधी जेव्हा तिनं एका मुलाला जन्म दिला होता, तेव्हापेक्षा आता तिचं वजन जास्त होतं. द सनच्या वृत्तानुसार, लिंडसेनं सांगितलं, मी याबद्दल विचार करत असतानाच नर्सला काहीतरी वेगळंच दिसलं. तिला वाटलं की ही पाण्याची पिशवी आहे. मात्र, मला वेगळंच काहीतरी जाणवलं आणि इतक्यात माझ्या आणखी एका मुलीचा जन्म झाला. माझी दुसरी मुलगी हातात येताच मी आनंदानं जोरजोरात ओरडू लागले. आमच्यात कोणालाच अंदाज नव्हता की मी जुळ्या मुलांना जन्म देईल. माझी बहीण लगेचच फोटो काढू लागली, असं या महिलेनं सांगितलं. लिंडसेनं म्हटलं, की काही महिने सगळं ठीक होतं आणि मला अल्ट्रासाउंड करण्याची गरज वाटली नाही. मात्र, जेव्हा मी अल्ट्रासाउंड केलं तेव्हाही यात दोन मुलं दिसली नाहीत. कदाचित ते व्यवस्थित केलं गेलं नव्हतं. इतकंच नाही तर जेव्हा मी लेबर रुममध्ये गेले तेव्हा त्यांनी मला बेबी मॉनिटरसोबत कनेक्ट केलं. यातही हदयाच्या केवळ एकाचं ठोक्याचं रिडिंग येत होतं. बाल्कनीत सुरू होता रोमान्स; न्यूड अवस्थेतच खाली कोसळली महिला अन्…, VIDEO लिंडसेनं या जुळ्या मुलांना मागील वर्षी जन्म दिला होता. बाळांच्या जन्माचा हा फोटो आता तिनं आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. आयुष्यात मिळालेल्या या भेटीमुळे आम्ही खूप आनंदी असल्याचं तिनं म्हटलं.