व्हायरल व्हिडीओ
मुंबई, 28 फेब्रुवारी : सोशल मीडियावर एक अतिशय मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही हसू आवरू शकणार नाही. यामध्ये एका व्यक्तीसोबत असा काही प्रकार घडतो, जे या व्यक्तीच्या आयुष्यभर लक्षात राहील. शिवाय हा व्हिडीओ लोकांसमोर एक उदाहरण ठेवत आहे की लोभ किंवा लालच लोकांसाठी किती धोकादायक असू शकतो. व्हिडीओच्या सुरुवातीला मजूर रस्त्याने चालताना दिसत आहे, तेव्हा मजुराच्या खांद्यावर जुना सिमेंटचा पत्रा आहे. त्याने संरक्षणासाठी टोपी आणि बूट घातले आहेत. हे त्याला कामाच्या ठिकाणी दुखापत होण्यापासून प्रतिबंधित करेल. तो त्याच्या कामात व्यस्त होता. तेव्हा त्याला रस्त्यात पैसे पडलेले दिसते. एका तरुणासाठी भिडल्या दोघी, तरुणींच्या हाणामारीचा Video तुफान व्हायरल या मजुराने आधी इकडे-तिकडे पाहिले आणि मग ते पैसे उचलण्याचा निर्णय घेतला. तो हळूहळू खाली बसला आणि त्याने पैसे उचलले. पण त्यानंतर त्याच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. खरंतर हा एक प्रँक होता. त्यामुळे जेव्हा या व्यक्तीने पैसे उचलले, तेव्हा बाजूला असलेल्या एका गोणीतून साप बाहेर आला, जो या व्यक्तीच्या थेट अंगावर आला, तसे पाहाता हा साप खोटा आहे, पण तो ज्या पद्धतीने अंगावर आला, ते पाहून कोणीही घाबरुन जाईल. पण साप आल्यावर हा मजूर असा काही घाबरला की तो थेड खालीच पडला, ज्यामुळे त्याच्या हातात असलेला पत्रा तुटला, त्याने सापाला घाबरुन इकडे तिकडे अशा काही उड्या मारल्या की बस्स… त्याने उड्या मारताना मागचा पुढचा कशाचाच विचार केला नाही, त्याला फक्त त्या सापापासून स्वत:ला वाचवायचं होतं.
या तरुणासोबत हा जो काही प्रकार घडला होता, ते पाहून असं तरी दिसतंय की आता रस्त्यावर पैसे उचलण्याची आणि लोभ करण्याची चुक ही व्यक्ती कधीही करणार नाही.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, जो पाहून लोकांनी देखील त्यावर कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. या व्हिडीओला लाईक्स आणि व्ह्यूज देखील मिळाले आहेत.