व्हॅटिकन सिटी, 2 जानेवारी : आशीर्वादाच्या अपेक्षेने पोपचा हात हातात घेऊन तो तसाच धरून ठेवणाऱ्या एका महिलेवर पोप भडकले आणि तिच्या हातातून हात सोडवून घेण्यासाठी तिच्या हातावर फटका मारला. एका महिलेच्या हातून आपला हात सोडवून घेताना रागाने तिच्या हातावर चापटी मारणारा पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांचा VIDEO सोशल मीडियावर चांगलाच VIRAL झाला. आपला संमय अनेक वेळा संपतो, माझासुद्धा! असं म्हणत पोपनं त्या अज्ञात महिलेची माफी मागितली आहे. व्हॅटिकन सिटीमध्ये (Vatican city) नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पोप त्यांच्या दर्शनासाठी जमलेल्या भक्तमंडळींची भेट घेत होते. ख्रिश्चन धर्मातल्या प्रथेनुसार, प्रत्येकालाच पोप यांनी आपला हात हातात घेऊन आशीर्वाद द्यावेत, असं वाटत होतं. शक्य होईल तेवढ्या लोकांचा हात हातात घेत पोप संवाद साधत होते. एका महिलेनं पोप यांचा हात घट्ट धरून ठेवला. ती तो सोडायलाच तयार नव्हती. पोप यांना तिने हात धरून खेचलंसुद्धा. तेव्हा पोप यांनी रागाने दुसऱ्या हातने मारलं आणि हात सोडवून घेतला.
महिलेच्या हातावर मारतानाचा पोप यांचा तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. पोप या व्हिडिओत चांगलेच चिडलेले दिसत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. अखेर पोप हेसुद्धा माणूस आहेत, असं काही यूजर्सनी म्हटलं आहे. पोप यांनी आता या कृतीबद्दल माफी मागितली आहे. So many times we lose patience, even me असं म्हणत त्यांनी त्या महिलेची माफी मागितली. ————— अन्य बातम्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला दिल्लीच्या परेडमध्ये केंद्राने परवानगी नाकारली CDS बिपिन रावत यांच्या नावे बनावट पत्र होतेय Viral, लष्कराचा सतर्कतेचा इशारा 602 केबिनबद्दल प्रश्न विचारताच अजित पवार भडकले ‘रेप नहीं प्यार था मिलॉर्ड..’, मूकबधीर आरोपीची कोर्टाने केली निर्दोष मुक्तता