JOIN US
मराठी बातम्या / Viral / महिलेसमोरच कपडे काढून प्रायव्हेट पार्ट दाखवू लागला पोलीस; घटना समोर येताच सांगितलं विचित्र कारण

महिलेसमोरच कपडे काढून प्रायव्हेट पार्ट दाखवू लागला पोलीस; घटना समोर येताच सांगितलं विचित्र कारण

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला, हा व्हिडिओ (Viral Video of Cop) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral on Social Media) होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कराची 02 ऑगस्ट : एक अत्यंत हैराण करणारं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या घटनेत एका पोलीस उपनिरीक्षकानं एका महिलेसमोरच आपले कपडे काढले आणि तिला आपला प्रायव्हेट पार्ट दाखवू लागला (Police Sub-Inspector Shows Private Part To Woman) . आरोपी पोलीस इतक्यावरच थांबला नाही, तर त्यानं महिलेला घाणेरड्या शब्दात शिवीगाळही केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला, हा व्हिडिओ (Viral Video of Cop) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral on Social Media) होत आहे. ‘मित्रांसोबत संबंध ठेव किंवा पैसे दे’; BFच्या धमकीनंतर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल ही घटना पाकिस्तानच्यया (Pakistan) लाहोरमधील (Lahore) शादबाग पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहे. आरोपी पोलीस आपल्या टीमसोबत पीडित महिलेच्या मुलांना अटक करण्यासाठी पोहोचला होता. जेव्हा महिलेनं पोलिसाला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या मुलाचा गुन्हा विचारला तेव्हा पोलीस उपनिरीक्षकाला राग आला आणि त्यानं महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यानं आपले कपडे काढले. अवघ्या 50 रुपयांवरून झालं मित्रांमध्ये भांडण आणि चाकूनं हल्ला; नेमकं घडलं काय? सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लाहोर पोलीस प्रशासनानं आरोपी पोलिसाच्या विरोधात कारवाई केली आणि त्याला सस्पेंड केलं. यासोबतच आरोपीला अटकही केली. डीआयजी साजिद कयानी यांनी सांगितलं, की प्रकरणाचा तपास केला असता, पोलीस उपनिरीक्षक दोषी असल्याचं समोर आलं आहे. आरोपी पोलीस संबंधित महिलेच्या दोन मुलांना अटक करण्यासाठी गेला होता. मात्र, महिला मुलांच्या बचावासाठी पुढे आली असता पोलिसांनी तिलाही व्हॅनमध्ये बसवलं आणि ठाण्यात आणलं. आरोपी पोलिसानं सांगितलं, की परिसरात हवाई फायरिंगचा आवाज ऐकून तिथे पोहोचलो होतो. जेव्हा ते आरोपीला अटक करण्यासाठी गेले तेव्हा आरोपीच्या आईनं आणि भावानं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलिसांच्या कामात अडथळा आणला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या