सॅल्यूट ! पॉईंटमनने मरणाच्या दारातून प्रवाशाला बाहेर काढलं; थरारक VIDEO व्हायरल
ठाणे, 17 नोव्हेंबर : कल्याण रेल्वे स्टेशनचा (Kalyan Railway Station) एक थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होण्यामागील कारण देखील तितकंच खास आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर आलेल्या एका चालत्या एक्सप्रेस गाडीमधून लवकर उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाचा तोल जातो आणि तो थेट फलाटाखाली जातो. पण त्यावेळी तिथे फलाटावर उभ्या असलेल्या पॉईंट्समनच्या (Pointsman) समोर ही घटना घडते आणि तो त्या प्रवाशाचा प्राण वाचवतो. प्रवाशाचा जीव वाचवणाऱ्या पॉईंट्समनचं शिवाजी सिंह असं नाव आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
कल्याण रेल्वे स्थानकावर रविवारी (14 नोव्हेंबर) एक प्रचंड थरारक घटना घडली. एका रेल्वे कर्माचाऱ्याच्या धाडसाने एका प्रवाशाचा प्राण वाचला. हा प्रवासी चालत्या ट्रेनने फलाटावर उतरण्याच्या प्रयत्नात होता. पण त्याचा तोल गेला आणि तो फलाट आणि गाडीच्या अंतरात असलेल्या गॅपमध्ये पडला. यावेळी फलाटावर काम करत असलेल्या पॉईंट्समनने त्याला रेल्वेखाली पडताना पाहिले. त्याने मागचापुढचा कोणताही विचार न करता तो थेट त्या प्रवाशाला वाचविण्यासाठी पुढे धावत गेला. विशेष म्हणजे त्याने सुखरुप त्या प्रवाशाला बाहेर देखील काढलं. हेही वाचा : हतबल पोलिसावर पोटच्या लेकाला विकण्याची वेळ
या घटनेच्या वेळी मदतीला थोडा उशिर झाला असता तर प्रवाशाच्या जीवाला धोका ठरला असता. याशिवाय प्रवाशाला वाचवायला गेलेला कर्मचारीदेखील कदाचित फलाटावरुन खाली पडला असता. पण तरीही तो पॉईंट्समन मदतीसाठी पुढे धावला. त्याच्या या कामगिरीची सोशल मीडियावर खूप कौतुक होतंय. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर या घटनेचा 11 सेकंदाचा व्हिडीओ शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. पॉईंट्समनच्या कामाचं प्रचंड कौतुक होत आहे.
हेही वाचा : दिराच्या लग्नात वैनीचा भन्नाट डान्स, पाहा जबरदस्त VIDEO या व्हिडीओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. जीवावर उदार होऊन किंवा दुसऱ्या इतक्या तत्परतेने धावून जाणारे माणसं खूप कमी असतात. शिवाजी सिंह यांनी प्रवशाचा जीव वाचवून माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. त्यांच्या याच चांगल्या कामाची दखल मध्य रेल्वे प्रशासनाने देखील घेतलीय. मध्य रेल्वेने संबंधित घटनेचा व्हिडीओ शेअर करुन शिवाजी सिंह यांचं काम देशातील लाखो घरांपर्यंत पोहोचवलं आहे.