नवी दिल्ली 14 मार्च : जगात असे अनेक लोक आहेत ज्यांच्यासाठी चहा म्हणजे जीव की प्राण आहे (Tea Lovers). सकाळ असो किंवा संध्याकाळ या लोकांना कधीही चहा दिला, तरी ते नाही म्हणणार नाहीत. चहाचेही वेगवेगळे प्रकार असतात. यात आल्याचा चहा, काळ्या मिरचीचा चहा, कोरा चहा, फक्त दुधाचा चहा असे बरेच प्रकार आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चेत असेलला चहा अतिशय वेगळा आहे, कारण हा गुलाबी रंगाचा चहा आहे (Viral Video Of Pink Tea). Petroleum Jelly वापरुन दीर्घकाळ टिकतो परफ्यूमचा सुगंध? वाचा काय आहे ही ट्रिक सांगितलं जात आहे की हा व्हिडिओ उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील आहे. यात दुकानदार लोकांना गुलाबी रंगाचा चहा देताना दिसतो (Pink Tea in the Market). हा चहा बनवण्याची पद्धतही अतिशय वेगळी आहे. याचा रंग चहासारखा नाही तर एखाद्या मिल्कशेकसारखा दिसतो.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की चहा बनवणारा व्यक्ती चहात बुडवून खाण्याची खारी तोडून कपामध्ये टाकतो. यानंतर यात घरीच बनवण्यात आलेल्या खाव्याचा तुकडा टाकतो. यानंतर दुकानदार चहाच्या किटलीमधील गुलाबी रंगाचा चहा या कपामध्ये ओततो. या चहाला तसं तर पिंक टी या नावाने ओळखलं जातं, मात्र याचं पारंपारिक नाव ‘नून चाय’ असं आहे.
Instagram वर हा व्हिडिओ @yumyumindia नावाच्या फूड ब्लॉगवरुन अपलोड केला गेला आहे. व्हिडिओला देण्यात आलेल्या कॅप्शननुसार, हा स्पेशल चहा उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये मिळतो. लोकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने सांगितलं की हा पिंक चहा नाही तर नून चाय आहे. तर दुसऱ्या एकाने म्हटलं की हा काश्मिरी चहा आहे आणि याची चव वेगळीच असते. काश्मीरमध्ये या चहाला नून चहा असं म्हणतात. याची चव थोडी खारट असते. चहामध्ये टाकण्यात आलेल्या बेकिंग सोडामुळे त्याचा रंग गुलाबी होतो.