JOIN US
मराठी बातम्या / Viral / गळ्यात 5 कोटीची साखळी, रक्षणासाठी बॉडीगार्ड अन् बरंच काही...! या श्वानाची Lifestyle जाणून वाटेल हेवा

गळ्यात 5 कोटीची साखळी, रक्षणासाठी बॉडीगार्ड अन् बरंच काही...! या श्वानाची Lifestyle जाणून वाटेल हेवा

महिलेनं आपल्या पाळीव श्वानासाठी करोडो रूपये किंमत असलेला हिऱ्यांचा हार बनवून घेतला आहे (Dog Using Diamond Chain Worth Rupees 5 Crore). इतकंच नाही तर महिलेनं त्याच्या रक्षणासाठी बॉडीगार्डही ठेवला आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 19 मार्च : अनेक लोकांना प्राण्यांची इतकी आवड असते, की ते आपल्या घरामध्ये अनेक पाळीव प्राणी आणून ठेवतात. इतकंच नाही तर या प्राण्यांची अगदी पोटच्या मुलांप्रमाणे काळजीही घेतात. बदल्यात हे प्राणीही आपल्या मालकाला तितकाच जीव लावतात आणि मालकासाठी तेवढेच ईमानदारही राहातात. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की माणसं सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करत राहातात. यासाठी ते स्वतःवर भरपूर पैसेही खर्च करतात. मात्र एका महिलेचं आपल्या श्वानावर इतकं प्रेम आहे, की त्याच्यासाठी महिलेने केलेल्या गोष्टी जाणून तुम्हीही थक्क व्हाल. बाप रे बाप! घरातील बाथरूम शॉवरमध्ये दडून बसले होते 10 साप आणि अचानक… महिलेनं आपल्या पाळीव श्वानासाठी करोडो रूपये किंमत असलेला हिऱ्यांचा हार बनवून घेतला आहे (Dog Using Diamond Chain Worth Rupees 5 Crore). इतकंच नाही तर महिलेनं त्याच्या रक्षणासाठी बॉडीगार्डही ठेवला आहे (Bodyguard for Pet Dog). द सनच्या रिपोर्टनुसार, लंडनमध्ये राहाणाऱ्या 37 वर्षीय ज्वॅलर नॅथली नॉफ या महिलेनं आपल्या पाळीव श्वानासाठी हिऱ्यांच्या साखळीप्रमाणे दिसणारी कॉलर बनवली आहे. ज्याची किंमत 5 कोटी रूपये इतकी आहे. या श्वानाला डॉग शोमध्ये भाग घ्यायचा होता. याच कारणामुळे आपला श्वान जास्त सुंदर दिसावा म्हणून महिलेनं हे सगळं केलं होतं. जेव्हा या श्वानाने डॉग शोमध्ये भाग घेतला, तेव्हा त्याला पाहून लोक आश्चर्यचकित झाले. श्वानाच्या गळ्यात असलेली हिऱ्यांची साखळी 15 कॅरेटची आहे. मजा करायला जंगलात गेला चिमुकला; अचानक समोर आला भयंकर प्राणी; काय घडलं पाहा VIDEO नॅथलीचं असं म्हणणं आहे की तिची अशी इच्छा आहे की तिचा श्वानही मालकाप्रमाणेच सर्वात सुंदर दिसावा. तिने आपल्या श्वानाच्या रक्षणासाठी बॉडीगार्डही ठेवले आहेत. सोबत तिने असंही सांगितलं की श्वानाच्या गळ्यात साखळी हरवण्याचीही भीती तिला नाही, कारण यासाठी तिने सुरक्षा लावलेली आहे. पुढे ही महिला म्हणाली, की मी माझ्या श्वानावर इतकं प्रेम करते, की त्याच्यापुढे या हाराची किंमतही मला काहीच वाटत नाही. महिलेकडील श्वान Pomeranian ब्रीडचा आहे. तो आता 4 वर्षांचा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या