व्हायरल
नवी दिल्ली, 7 एप्रिल : नशेच्या अवस्थेत अनेक लोकांना काहीही कळत नाही. नशेमध्ये अनेक लोकांचे मजेशीर, विचित्र, भयानक व्हिडीओ समोर आले आहेत. काही वेळा तर अशाही घटना समोर येतात की, नशेमध्ये लोक स्वतःचाच जीव धोक्यात घालतात. सध्या समोर आलेल्या घटनेत एका व्यक्तीसोबत खूप भयानक प्रकार घडला मात्र त्याच्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. एखादी व्यक्ती तिसऱ्या चौथ्या मजल्यावरुन पडली तरी गंभीर दुखापत होती किंवा जीवदेखील गमवावा लागतो. मात्र सध्या समोर आलेल्य घटनेत व्यक्ती चक्क 19 व्या मजल्यावरुन खाली कोसळली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या उंचावरुन पडूनही तो व्यक्ती बचावला आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.
दारुच्या नशेत व्यक्ती 19 व्या मजल्यावरुन खाली कोसळला. गाडीचा चक्काचूर झाला मात्र घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी व्यक्तीला बाहेर काढले. या अपघातातही तो त्याच्या पायावर उभा राहून चालत होता. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये व्यक्ती गाणं गाताना दिसली. या अपघातामुळे आसपासचे लोक घाबरले होते पण अपघात झालेल्या व्यक्तीला पाहून त्याच्यासोबत एवढा भीषण अपघात झाला असं वाटतंच नव्हतं.
दरम्यान, @lonermonkeyy नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर सध्या खूप कमेंट पहायला मिळत आहेत. काही वेळातच हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसला.