चालत्या ट्रेनमध्ये व्यक्तीने मांडलं पाणीपुरीचं दुकान
नवी दिल्ली, 26 जून : जगभरात लाखो हजारो लोक ट्रेनने प्रवास करतात. ट्रेनमध्ये तुफान गर्दी पहायला मिळते. एवढंच नाही तर रोज ट्रेनमधील काही ना काही घटना व्हायरल होतात. आपण विचारही करु शकत नाही अशा गोष्टी लोक चालू ट्रेनमध्ये करतात. नुकताच ट्रेनमधील एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एक व्यक्ती चक्क पाणीपुरी विकतोय. हे दृश्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एका व्यक्तीने चालू ट्रेनमध्ये पाणीपुरीची गाडी लावली आहे. या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओनं इंटरनेटवर एकच धुमाकूळ घातलेला पहायला मिळतोय.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती चालू ट्रेनमध्ये पाणीपुरी विकतोय. एवढंच नाही तर लोकही ट्रेनमध्येही पाणीपुरी खाण्याचा मोह आवरु शकले नाही आणि त्यावर तुटून पडले. अनेकांनी या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. बघता बघता थोड्याच वेळात व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल झाला.
@sagarcasm नावाच्या ट्विटर अकाऊंटने हा व्हिडीओ शेअर केलाय. 14 सेकंदांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. एवढंच नाही तर लोक व्हिडीओवर अनेक कमेंटही करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे स्पष्ट झालं नाही. मात्र अनेकजण या निष्काळजीपणामुळे संताप व्यक्त करत आहेत. इथे लोकांना उभं रहायला जागा नसते आणि व्यक्ती पाणीपुरी विकतोय. लहानापांसून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाणीपुरी आवडते. त्यामुळे पाणीपुरी दिसल्यावर लोक खाण्याचा मोह आवरु शकत नाही. भारतीय स्ट्रीट फूड खाण्याचे खूप वेडे आहेत. त्यामुळे ते कुठेही कधीही याचा आनंद घेण्यासाठी तयार असतात.