JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : फणस तोडायला व्यक्ती चढला झाडावर, अचानक आला साप आणि घडलं धक्कादायक

Viral Video : फणस तोडायला व्यक्ती चढला झाडावर, अचानक आला साप आणि घडलं धक्कादायक

सापाचं नाव ऐकलं तरी अंगावर काटा उभा राहतो. बहुतांश लोक सापाला खूप घाबरतात. त्याच्या हल्ल्यात वाचणं कठिण असतं त्यामुळे लोक त्याच्या जवळ जाणंही टाळतात.

जाहिरात

अचानक आला साप आणि घडलं धक्कादायक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 जुलै : सापाचं नाव ऐकलं तरी अंगावर काटा उभा राहतो. बहुतांश लोक सापाला खूप घाबरतात. त्याच्या हल्ल्यात वाचणं कठिण असतं त्यामुळे लोक त्याच्या जवळ जाणंही टाळतात. मात्र अचानक एखादा साप तुमच्या पायावर चढला तर? कधी विचार केलाय का. असाच प्रकार एका व्यक्तीसोबत घडला. तो फणस तोडायला झाडावर तर चढला मात्र उतरताना सापाचं दर्शन झालं. याचाच व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्यक्तीला फणसाच्या झाडावर चढणं महागात पडलं. मोठमोठे फणस पाहून ती व्यक्ती तोडण्याचा मोह आवरु शकली नाही. मात्र हा मोह व्यक्तीच्या जीवाशी आल्याचं पहायला मिळालं.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये एका व्यक्तीच्या पायाला साप लटकलेला दिसत आहे. सापानं व्यक्तीच्या पायाला गुंडाळलं असून व्यक्तीला त्यातून सुटका करणं अवघड झालं. व्यक्ती झाडावर उभा असून त्याच्या त्यानं एका हाताने झाडाला पकलं आहे आणि दुसऱ्या हातात फणस आहे. व्यक्ती फणस काढायला झाडावर चढल्याचं स्पष्ट होत आहे. अचानक सापाने येत त्याच्या पायाला गुंडाळलं त्यामुळे त्याची अवस्था थरकाप उडवणारी झाली आहे. तो सापाच्या विळख्यातून आपला पाय सोडवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र ते दिसतंय तेवढं सोपं नाही.

संबंधित बातम्या

सापाच्या भितीने व्यक्ती हातातील फणसही खाली फेकतो. नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या काही वेळातच व्हिडीओ इंटरनेटर व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहे. दरम्यान, सापाच्या अनेक निरनिराळ्या आणि भयानक घटना सोशल मीडियावर समोर येत असतात. काही वेळा त्यांचे व्हिडीओदेखील समोर येत असतात. यापूर्वीही अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये सापांचे हल्ले पहायला मिळाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या