व्यक्तीने कच्च्या हिरव्या मिरच्या कचाकचा चावल्या
नवी दिल्ली, 13 जुलै : दिवसेंदिवस सोशल मीडियाची क्रेझ वाढत चालली आहे. लोक प्रसिद्धीसाठी, कायम चर्चेत राहण्यासाठी काहीही करतात. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शेअर करत ते लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. असे दररोज कित्येक व्हिडीओ इंटरनेटवर पहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. एका व्यक्तीनं चर्चेत राहण्यासाठी आणि थोड्याश्या लाईक्ससाठी कच्ची मिरची कचाकच चावल्याचा हा व्हिडीओ आहे. भाजीत मिरचीचे दोन-चार तुकडे टाकले तर खायचं अवघड होतं. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमधील ही व्यक्ती एक दोन नव्हे तर भरपूर मिरच्या चावून खाताना पहायला मिळाली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती कॅमेऱ्यासमोर बसला आहे. त्याच्या दोन्ही हातात कच्च्या हिरव्या मिरच्या आहेत. व्हिडीओ सुरु होताच त्याच्या डोळ्यातून पाणी पडतं आणि तो कच्च्या हिरव्या मिरच्या कचाकच खाऊ लागतो. व्हिडीओ पाहूनच तुम्हालाही तिखट लागेल. असे व्हिडीओ थोड्याच वेळात इंटरनेटवर व्हायरल होतात.
मिरची खातानाचा हा व्हायरल व्हिडीओ @rintu2_bhai नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसून आला. एवढंच नाही तर व्हिडीओवर अनेक कमेंटही येत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना लोकांनी लिहिलं की, केवळ लाइक्ससाठी स्वत:ला इतका त्रास देऊ नये, लाईक्ससाठी काहीही खाऊ नये. दरम्यान, एवढंच नाही तर हा माणूस कच्च्या भाज्याही खातो. त्याचे व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही हैराण व्हाल. त्याच्या अकाऊंटवर असे विचित्र पदार्थ खाण्याचे अनेक व्हिडीओ आहेत.