JOIN US
मराठी बातम्या / Viral / समुद्रकिनारी सेल्फी घेणं भोवलं; मोठी लाट येताच पाण्यासोबत वाहून गेले पर्यटक, VIDEO

समुद्रकिनारी सेल्फी घेणं भोवलं; मोठी लाट येताच पाण्यासोबत वाहून गेले पर्यटक, VIDEO

जगभरातील लोकांना समुद्रकिनारी उभा राहून सेल्फी घेण्याची तसेच समुद्र पाहण्याची क्रेझ आहे. मात्र, काहीवेळा असे सेल्फी खूप घातक आणि भयानक ठरतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 11 मे : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल (Viral Videos on Social Media) होत असतात. यातील काही व्हिडिओ अतिशय खास आणि मनोरंजक असतात. काही व्हिडिओ नेटकऱ्यांना खळखळून हसवतात, तर काही मोठा धडा देऊन जातात . सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून किनारपट्टी भागात राहणारे किंवा फिरायला जाणारे लोक आता सतर्क झाले आहेत. व्हिडिओमध्ये समुद्राच्या उंच लाटांमध्ये काही लोक अडकून पडल्याचं दिसतं (People Slammed By Massive Waves). कोलांटी उडी मारली आणि 20 वर्षीय तरुण पोहोचला lock-up मध्ये, IPS अधिकारी म्हणाला.. जगभरातील लोकांना समुद्रकिनारी उभा राहून सेल्फी घेण्याची तसेच समुद्र पाहण्याची क्रेझ आहे. मात्र, काहीवेळा असे सेल्फी खूप घातक आणि भयानक ठरतात. अलीकडेच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये याचं उदाहरण पाहायला मिळतं. यात समुद्रकिनाऱ्यावर उभे असलेले लोक समुद्राच्या लाटांसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये दिसतं की समुद्र किनाऱ्यावर वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे पाण्याच्या लाटा उसळत आहेत. हे पाहून लोकांना इथे सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. अनेकजण आपला फोन बाहेर काढून लाटांसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असतात. इतक्यात अचानक एक मोठी उंच लाट किनाऱ्यावर धडकते. अचानक आलेल्या या मोठ्या लाटेत किनाऱ्यावर उभा असलेले लोक अडकतात आणि ते खाली पडून काही अंतर वाहत जातात. यात अनेकजण जखमीही झाले. गेटमधून बाहेर येताच वळूने शिंगावर उचललं; मग जमिनीवर आपटून पायांनी तुडवलं, थरारक VIDEO सध्या हा व्हिडिओ युजर्सना किनारी भागात फिरताना सतर्क राहण्याचा संदेश देत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे आणि मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहे. बातमी देईपर्यंत व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत, हे एका भीतीदायक स्वप्नासारखं असल्याचं सांगत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या