JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - भुंकत धावत आले कुत्रे आणि...; सिंह, अस्वल बनून घाबरवण्याचा प्रयत्न पडला महागात

VIDEO - भुंकत धावत आले कुत्रे आणि...; सिंह, अस्वल बनून घाबरवण्याचा प्रयत्न पडला महागात

असं वेशांतर करून कुत्र्यांना घाबरवण्याचा प्रयत्न त्यांच्यावरच उलटला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 ऑगस्ट : कुत्रे (Dog), मांजर असे प्राणी आपल्याला त्रास देऊ लागले की एकतर आपण त्यांना हाकलतो किंवा त्यांना पळवण्यासाठी काठी हातात घेऊन त्याची भीती दाखवतो. पण दोन व्यक्तींनी मात्र तर कुत्र्यांना (Dog video) भागवण्यासाठी चक्क वेशांतर केलं. पण कुत्र्यांना घाबरवण्याचा (People scare dogs) त्यांचा हा प्रयत्न फसला. तो त्यांच्यावरच उलटला. कुत्र्यांना घाबरवण्यासाठी म्हणून दोन व्यक्ती सिंह आणि अस्वलाचा ड्रेस घालून घाबरावयाला गेलं (People dressed as bear and lion to scare dogs). पण तिथं जे काही होणार आहे, याचा विचारही त्यांनी केला नसेल. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

पंकज यादव फेसबुक युझरने हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे.  व्हिडीओत पाहू शकता, एका ठिकाणी भरपूर कुत्रे बसलेले आहेत. तिथं दोन व्यक्ती अस्वल आणि सिंहाचा ड्रेस घालून येतात. कुत्र्यांना घाबरवण्यासाठी ते असं रूप घेऊन येतात. कुत्र्यांना घाबरण्यासाठी म्हणून त्यांच्या जवळ येतात. पण डाव उलटाच पडतो. त्यांना पाहून कुत्रे घाबरण्याऐवजी उलट त्यांच्यावर धावून येतात. हे वाचा -  VIDEO - थेट म्हशीलाच उचलायला गेला पण…; स्वतःला बाहुबली समजणाऱ्या तरुणाची फजिती अशा विचित्र वेशात कुणीतरी आपल्याकडे येतं आहे हे पाहून कुत्रे मोठमोठ्याने भुंकू लागतात. त्यांच्या दिशेने धावत जातात. कुत्र्यांना आपल्याकडे येताना पाहून मग दोघंही घाबरतात. सिंहाचा ड्रेस घातलेली व्यक्ती तिथून कशीबशी पळ काढते. पण अस्वलाचा ड्रेस घातलेली व्यक्ती तिथंच अडकते. कुत्रे त्याला चारही बाजूने घेरतात. तो कुत्र्यांच्या कळपातून निसटण्याचा प्रयत्न करतो पण ते काही शक्य होत नाही. हे वाचा -  कोरोना लशीसाठी झिंझ्या उपटल्या, जमिनीवर आपटलं; एकमेकींच्या जीवावर उठल्या महिला हा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही. नेटिझन्सही हा व्हिडीओ पाहून चांगलीच मजा घेत आहेत. यावर मजेशीर कमेंट देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या