चोर समजून लोकांनी केली भयानक अवस्था
नवी दिल्ली 01 जून : अनेकदा असं घडतं की लोक काहीतरी प्रँक करायला जातात आणि हा प्रँक त्या व्यक्तीवरच उलटा पडतो. अशीच एक घटना सध्या समोर आली आहे. ज्यात एटीएमबाहेर लुटमारीचा प्रँक करणं एका प्रँकस्टरला चांगलाच महागात पडलं आणि या YouTube प्रँकने भलतंच वळण घेतलं. डॅनियल मारन, रॉबर्ट मिलाझो आणि जॉर्ज प्रोएस्टोस या तीन YouTubers नी बनावट दरोडा टाकला होता. ही घटना सुरुवातीला रेकलेस यूथ या चॅनलने यूट्यूबवर शेअर केली. व्हायरल व्हिडीओमध्ये एटीएम मशिनजवळ एक हूडी घातलेला व्यक्ती अचानक एका तरुणाला मागून पकडतो आणि त्याने नुकतीच काढलेली रोकड चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. या घटनेमुळे पीडत व्यक्ती मदतीसाठी हाक मारतो. आसपास असलेले लोक लगेचच त्याच्या मदतीसाठी धावून येतात. हे व्यक्ती चोराला मारहाण करतात आणि त्याने घेतलेले पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना हा प्रँक असल्याचं माहिती नव्हतं. Apple Store मध्ये चोरी करून पळत होता, दुसऱ्या मजल्याहून पडला अन् नको ते घडलं..VIDEO हे प्रकरण इतकं वाढतं की एक व्यक्ती चोराच्या चेहऱ्यावर जोरात बुक्की मारतो. यात प्रँक करणाऱ्या व्यक्तीच्या नाकाला मोठी दुखापत होते आणि त्याचा पूर्ण चेहरा रक्ताने माखल्याने दिसतं. यानंतर या लोकांना असं वाटतं, की चोरीचा हा वाईट प्रयत्न आपण यशस्वीपणे थांबविला आहे. यानंतर चोर त्यांना सांगतो की “ही फक्त एक प्रँक होता” पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तुटलेलं नाक आणि रक्ताळलेला चेहरा असलेल्या या व्यक्तीचं नाव जॉर्ज प्रोस्टोस असल्याचं समोर आलं आहे. निष्पाप लोकांना आपल्या प्रँकने मूर्ख बनवण्याची त्याची योजना त्याच्यावरच भयंकरपणे उलटली, तसंच ऑनलाइन वापरकर्त्यांकडूनही त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
डेली न्यूजशी संवाद साधताना, रेकलेस युथचे सदस्य डॅनियल मारन म्हणाले की लोक एखाद्या अनोळखी व्यक्तीला लुटण्यात मदत करतात का हे पाहण्यासाठी हा प्रँक एक सामाजिक प्रयोग म्हणून केला गेला होता.